PMPML App | “आपली पीएमपीएमएल” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप पासून सावध रहा | पीएमपीएमएल चे प्रवाशांना आवाहन
Pune PMP – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “Apli PMPML” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात यु- ट्युब वरील काही चॅनल्स, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून पीएमपीएमएल प्रवाशांची दिशाभूल व आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. “Apli PMPML” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरूद्ध पोलीस प्रशासनाच्या सायबर सिक्युरिटी सेल विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीएमएल ची तांत्रिक विश्लेषण टीम बनावट अॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवत असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर आय.टी. अॅक्टनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Pune PMPML)
यु-ट्युब, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या व्यक्ती, आम्ही तुम्हाला “Apli PMPML” चे बनावट अॅप देतो त्यावरून तुम्ही पैसे न देता पास काढू शकता अशा भूलथापा देवून बनावट अॅप ची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे पीएमपीएमएल प्रवाशांची आर्थिक
फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरी प्रवाशी नागरिकांनी समाजमाध्यमांवरील “Apli PMPML” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.
तसेच पीएमपीएमएल चे बनावट अॅप वापरताना कोणी आढळल्यास अशा व्यक्तींविरूद्ध देखील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा पीएमपीच्या वतीने देण्यात आला आहे.
COMMENTS