पीएमपी कर्मचाऱ्यांना आरोग्य बिलासाठी देखील वाटच पाहावी लागणार
: 4 कोटी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला
पुणे : महापालिका कर्मचाऱ्या सोबतच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील महापालिकेच्या अंशदायी आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते. उर्वरित 90% रक्कम महापालिका देते. यासाठी 4 कोटी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य सभेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र मुख्य सभेने हा प्रस्ताव महिन्या भरासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे आरोग्य बिलासाठी देखील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे.
: स्थायी समितीने मान्य केला होता विषय
महापालिकेच्या वतीने अंशदायी आरोग्य राबवली जाते. महापालिका कर्मचारी, पीएमपी कर्मचारी, शिक्षण मंडळाचे कर्मचारी, आजी माजी नगरसेवक या सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो. एकूण बिलाच्या 10 % रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी लागते. उर्वरित 90% रक्कम महापालिका संबंधित हॉस्पिटल मध्ये भरते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात करोडोंची तरतूद करण्यात येते. दरम्यान पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य बिलांची 4 कोटींची रक्कम थकीत होती. ती देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता देखील दिली होती. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपत असताना हा विषय मंजूर करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य सभेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र मुख्य सभेने हा प्रस्ताव महिन्या भरासाठी पुढे ढकलला आहे. महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी नुकतीच मुख्य सभा आयोजित केली होती. त्यामध्ये हा विषय पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य बिलासाठी देखील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे.
COMMENTS