PMC Warje Multispeciality Hospital- MP Supriya Sule | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा व्हाईट पेपर जाहीर करावा | सुप्रिया सुळे यांचा हॉस्पिटल व्यावसायिक असल्याचा आरोप

HomeपुणेBreaking News

PMC Warje Multispeciality Hospital- MP Supriya Sule | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा व्हाईट पेपर जाहीर करावा | सुप्रिया सुळे यांचा हॉस्पिटल व्यावसायिक असल्याचा आरोप

गणेश मुळे Mar 10, 2024 9:24 AM

MP Supriya Sule News | पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे
Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Pune Metro Phase 2 | पुणे मेट्रोच्या टप्पा -२ च्या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला महाराष्ट्र शासनाची मान्यता | खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील मार्गीकांना महाराष्ट्र शासनाची मान्यता!

PMC Warje Multispeciality Hospital- MP Supriya Sule | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा व्हाईट पेपर जाहीर करावा | सुप्रिया सुळे यांचा हॉस्पिटल व्यावसायिक असल्याचा आरोप

PMC Warje Multispeciality Hospital- Supriya Sule – (The Karbhari News Service) |  वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत पुणे महापालिकेने श्वेतपत्रिका (White Paper) जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. सुळे म्हणाल्या, हॉस्पिटल मध्ये 16 टक्के लोकांना मोफत आणि शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. तर 84 टक्के बेड्सचा कमर्शियल वापर होणार आहे. महापालिकेच्या मालकीची कोट्यवधींची जमीन असून कर्जाला ही हमी दिली आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी नसून व्यावसायिकाच्या हितासाठी उभारण्यात येत असल्याचा आरोप  खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच आम्ही सत्तेत आल्यावर रुग्णांना मोफत उपचार देऊ, असे आश्वासन देखील सुळे यांनी यावेळी दिले.

वारजे येथे महापालिकेच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी ही मागणी केली. सुळे म्हणाल्या, की महापालिकेच्या हॉस्पिटलचे उदघाटन आहे. मात्र उपमुख्य मंत्र्यांच्या भाषणानंतर लक्षात आले की याठिकाणी गोरगरिबांना फक्त दहा टक्के बेड्स मोफत व सहा टक्के बेड्स शासकीय दराने उपलब्ध होणार आहेत. उर्वरित 84 बेडसचा व्यवसायिक वापर होणार आहे. नेदरलँडचा उद्देश एवढा चांगला असेल तर पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या धर्तीवर 100 टक्के बेडसवर मोफत अथवा माफक दरामध्ये उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यास हरकत नाही.

सुळे म्हणाल्या, महापालिकेची कोट्यवधींची जमीन, कर्जाला महापालिकेची हमी असताना जेमतेम 16 टक्के बेड्स आणि वर्षाला एक कोटी भाडे मिळणार हे सर्व काही संशयास्पद आहे. यासाठी श्वेत पत्रिका काढून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी आणि 100 टक्के बेडसवर गरिबांना उपचार मिळावेत अशी आमची मागणी आहे. आम्ही सत्तेत आल्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या धर्तीवर वारजे हॉस्पिटल मध्ये गोरगरिबांवर अगदी माफक दरात उपचारांची सुविधा उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन सुळे यांनी यावेळी दिले.