PMC Ward No 2 | प्रभाग दोनच्या नागरी प्रश्नावर अधिकारी ‘ऑन चार्ज’

Homeadministrative

PMC Ward No 2 | प्रभाग दोनच्या नागरी प्रश्नावर अधिकारी ‘ऑन चार्ज’

Ganesh Kumar Mule Oct 01, 2024 8:28 PM

Maharashtra Bhushan | पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली | केंद्रीय मंत्री अमित शहा
Hourly Basis Teacher | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता
Pune News | PMRDA | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुणेकरांना अनोखी भेट | वाचा सविस्तर 

PMC Ward No 2 | प्रभाग दोनच्या नागरी प्रश्नावर अधिकारी ‘ऑन चार्ज

– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीचे आयोजन

– प्रभाग दोन मधील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

 

Dr Siddarth Dhende  – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील विविध नागरी समस्यांचे वर्गीकरण करून या समस्या तत्काळ मार्गी लावला जाणार आहेत. कचरा, स्वच्छता, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आदी प्रभागातील नागरिकांची समस्यातून मुक्तता करण्यासाठी महापालिका अधिकारी ऑन चार्ज झाले आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग दोन मधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी कचरा, रस्ते दुरवस्था, सीसीटीव्ही उभारणे, शाळांची दुरवस्था आदी समस्यांचे गाऱ्हाणे अधिकाऱ्यांपुढे मांडले. या वेळी पुणे महापालिका परिमंडळ एकचे उपायुक्त राजीव नंदकर, पुणे शहर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक आदीसह क्षेत्रीय कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी या आश्वासन दिले. या बैठकीला विश्रांतवाडी पथारी संघटनेचे निलम अय्यर, पथ विक्रेता समितीचे विजय कांबळे, जिलानी शेख, दीपक मिरेकर, सोमनाथ खंडाळे, नाना ढेपे, सोनल वाईकर, मोहन चिंचकर नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, टिंगरे नगर, मोझे नगर, इंदिरानगर, शांतीनगर आदीसह परिसरातील नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते.

या बैठकीत नागरिकांनी विविध समस्‍या मांडल्‍या. यामध्ये टिंगरेनगर, विद्यानगर भागात फाईव्‍ह नाईन चौक ते भारत पेट्रोल पंप दरम्‍यान रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्‍यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे. हा व्हीआयपी मार्ग असतानाही वाहतूकीला अडथळे येत आहेत. त्‍याचे काम त्‍वरीत करावे. आमदार फंडातून चार पीएमपीएमएल बस थांबे उभारून जाहिरातीवर केला जाणारा खर्च बंद करावा. एकता नगर भागात पाच वर्षे ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. घरात पाणी जाऊन नागरिकांना त्रास होत आहे. त्‍यावर मार्ग काढावा. या परिसरात असणाऱ्या शाळांच्‍या शौचालयाची दुरवस्‍था झाली आहे. एकही रुपयांचे बजेट शाळेला मिळाले नाही. त्‍यामुळे इथे समस्‍या आहेत.

यासह शांतीनगर भागात ब्रीज पासून पुढे असणार दगडी रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. त्‍यामुळे अपघाताच्या शक्यता होत आहेत. कचरा रस्त्यावर टाकला जातो. मोकाट जनावरांचा त्रास होतो. या ठिकाणी कचरा वेळे उचलावा. जाधवनगर भागातील विहारात विजेची व्यवस्था नाही. सीसीटिव्ही बंद आहेत. समाज मंदिर पेंटिंग करावे. प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाने विविध समस्‍या मांडल्‍या. इंदिरानगर मध्ये नदीत राडारोडा टाकला जातो. त्‍यामुळे पात्र कमी होऊन पावसाळ्यात पाणी नागरिकांच्‍या घरात येते. या ठिकाणचा राडारोडा काढून राडारोडा करणाऱ्यांवर कारवाई करावी. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील एल ४७, ४८, ४९, ५१ मधील ड्रेनेज समस्‍या, सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्‍वीत करणे. पानटपरींवरील गुटखा विक्रीला बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. लुंबिणी उद्यानातील हास्य क्लबसाठी बसण्याची व्‍यवस्‍था करावी. तक्षशिला बुद्ध विहारात पावसाचे पाणी येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, आदीसह विविध समस्‍या मांडल्‍या.

या वेळी महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर म्हणाले की, नागरिकांनी मांडलेल्‍या समस्यांचे वर्गीकरण करून त्यानुसार आपण कार्यवाही करू. जलद सुटणाऱ्या समस्या लवकर सोडवू. टिंगरेनगर येथील मलबा उचलून घेऊन जाण्याच्या सूचना देऊ. किंवा ठेकेदाराला सांगण्यात येईल. एकतानगर मध्ये ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू. शांतीनगर मधील खड्डे दूर करण्यासाठी संबंधित विभागाला सांगण्यात येईल. कचरा समस्यावर यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहे. बैठक घेऊन कचरा वेचकांना योग्य त्‍या सूचना दिल्‍या जातील. जाधवनगर समाज मंदिर पेंटिंग करून सीसीटीव्ही बाबत तोडगा काढू. इंदिरानगर मधील राडारोडा काढण्याची कार्यवाही करू. गुटखा विक्रीबाबत टपरीधारकांना सूनावले जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले.


प्रभागात सीसीटिव्ही असूनही कचरा कुठेही टाकणाऱ्यावर करा. स्वच्छचे कर्मचारी बेशिस्त वागतात त्यांना योग्य सूचना द्याव्यात. सर्व नागरिकांना ड्रेनेज समस्या आहेत. बजेट आहे. त्याची अंमलबजावणी करून ही कामे करावीत. स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र शेड द्यावे. त्रिदल नगर चौक कमर्शियल आहे. त्याचे काम थांबले आहे. तिथे पार्किंग करावे. जुनी भाजी मंडई पडून आहे. तिथे ओपन स्पेस करा, आदीसह विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत. अधिकाऱ्यांनी बैठकीला सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे.

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0