PMC Ward no 2 | प्रभाग दोन साठी आयुक्तांचे मान्सून ‘गिफ्ट’ | ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर दरम्यान पावसाळी लाईनसाठी दीड कोटींची मंजूरी
| डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश
Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर दरम्यान पावसाळी लाईनसाठी पुणे महापालिकेने दीड कोटींची मंजुरी दिली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले. पावसाळी लाईन टाकल्यानंतर पावसाळ्यात ई कॉमरझोन चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. आयुक्तांनी प्रभाग दोनसाठी दिलेल्या या मान्सून गिफ्ट मुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रभाग क्र. २ नागपूर चाळ, फुलेनगर मधील ई कॉमर झोन समोरील रस्ता अग्रसेन ते शाहू चौक रस्ता आपणामुळे रहदारीसाठी शक्य झाला आहे. परंतू शहनशाह दर्गा चौक येथील पावसाळी लाईनमुळे एक ते दोन तास जरी पाउस पडला तरी पाणी प्रचंड प्रमाणात साचून राहते. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा देखील होत आहे. सदरील ठिकाणी पावसाळी लाईन टाकणेसाठी चे पत्र देखील दिले आहे. त्या अनुषंगाने आपल्या खात्यामार्फत याचा सर्व्हे झालेला आहे. त्या सर्व्हेमध्ये पावसाळी लाईन टाकून देण्याचे प्रस्तावित केले आहे.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २ मधील ई कॉमरझोन चौकात दर पावसाळ्यात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यामुळे खड्डे पडत आहेत. वाहने खड्ड्यात आढळल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत होता. तसेच याठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळी वाहनांची संख्या अधिक असल्याने नागरिकांचा तासन तास वाहतूक कोंडी जात आहे. नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून पावसाळी लाईन बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. धेंडे यांनी दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला.
ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर याठिकाणी पावसाळी लाईन टाकणेसाठी दीड कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. हे काम तातडीने करून पुढच्या पावसाळ्यामध्ये नागरीकांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली. आपल्या खात्याकडे रक्कम उपलब्ध असल्याने दीड कोटी निधीस वर्गीकरणाची मान्यता द्यावी, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी फेब्रुवारी मध्ये मंजुरी दिली आहे. आचारसंहितेमध्ये हे काम थांबले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वे करण्यात आला. मागील आठवड्यात रोड कटिंग आणि वाहतूक विभागाचे ना हरकत पत्र मिळाले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने नागरीकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.
—–
गेली दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले. ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर याठिकाणी पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी काम सुरु असताना वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता नागरिकांनी देखील घ्यावी. भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता वाहनधारक मुक्त होतील.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका