PMC Ward Committee Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी झाली निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष निवडले बिनविरोध

Homeadministrative

PMC Ward Committee Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी झाली निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष निवडले बिनविरोध

Ganesh Kumar Mule Apr 21, 2026 7:03 PM

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme | एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा
PMC Election Voter List | मतदार यादीतील दुबार नावे वगळा | अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू
Governor Ramesh Bais | राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे | राज्यपाल रमेश बैस

PMC Ward Committee Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी झाली निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष निवडले बिनविरोध

| एक प्रभाग  अजित पवार गटाकडे | एक अध्यक्ष पद  कॉंग्रेसला

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी  मंगळवारी म्हणजे २१ एप्रिल ला निवडणूक प्रक्रिया पार पडली.  एकूण १७ अर्ज नगरसचिव विभागाकडे आले होते. यामुळे आता दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असल्याचे चिन्ह होती.  येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते. त्यानुसार यासाठी आज निवडणूक पार पडली. बाकी १३ अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले. (Pune Municipal Corporation – PMC)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २९ अ १ नुसार सर्व प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला. आह स्थायी समितीच्या सभागृहात हा निवडणूक कार्यक्रम पार पडला. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांनी अप्पर जिल्हाधिकारी सतीश राउत उपस्थित होते.

भाजपने १४ नगरसेवकांची शिफारस केली होती. यातील एक उमेदवार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा होता.  तर कॉंग्रेस ने देखील एक उमेदवार दिला होता. वानवडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस ने साहिल केदारी यांचा अर्ज भरला होता. केदारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते.  येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय साठी भाजपच्या कविता गलांडे आणि कॉंग्रेस च्या विशाल  मलके यांनी अर्ज भरले होते. कुणीही अर्ज माघारी न घेतल्याने इथे निवडणूक झाली.  या प्रभाग समितीत एकूण १२ नगरसेवक आहेत. यात गलांडे यांना ८ तर मलके यांना ४ मते मिळाली.  तर ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस च्या वैशाली भालेराव आणि अजित पवार गटाच्या सुरेखा कवडे यांचे अर्ज आले होते. त्यानुसार निवडणूक होऊन सुरेखा कवडे या विजयी झाल्या. त्यांना ५ मते मिळाली तर भालेराव यांना ३ मते मिळाली.

यानुसार आता १३ समिती अध्यक्ष भाजपकडे, १ अजित पवार गट आणि एक अध्यक्ष पद हे कॉंगेस कडे असणार आहे.

 

| पुणे महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्षांची यादी – २०२६-२७

नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय – अनिल दिलीप सातव

येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय – गलांडे कविता महेंद्र

ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय – कवडे सुरेखा चंद्रकांत

छ. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय – अमृता राम म्हेत्रे

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय – चिमटे रोहिणी सुधीर

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय – जाधव वासंती नवनाथ

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय –  खर्डेकर मंजुश्री संदीप

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय – मोरे सचिन रावसाहेब

धनकवडी कात्रज आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय – चोरघे प्रतिभा रोहिदास

कोंढवा उंड्री क्षेत्रीय कार्यालय – टिळेकर रंजना कुंडलिक

हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय – तुपे प्रशांत उर्फ मामा

वानवडी क्षेत्रीय कार्यालय – ॲड. केदारी साहील शिवाजी

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – चोरबेले मनीषा प्रवीण

कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय – उज्वला गणेश यादव

विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय – राघवेंद्र दिपक मानकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0