PMC Ward 27 – Navi Peth Parvati | प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ – पर्वती | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या!

Homeadministrative

PMC Ward 27 – Navi Peth Parvati | प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ – पर्वती | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या!

Ganesh Kumar Mule Sep 07, 2025 7:24 PM

PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या
PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर
PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

PMC Ward 27 – Navi Peth Parvati | प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ – पर्वती | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या!

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील २७ व्या क्रमांकाचा प्रभाग म्हणजे नवी पेठ पर्वती. या प्रभागात नवी पेठ, पर्वती गावठाण, पर्वती दर्शन वसाहत, अलका टॉकीज, पुना हॉस्पीटल, पत्रकार भवन, असे परिसर मोडतात. या प्रभागाची रचना आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) – 2025)

 

 

प्रभाग क्रमांक २७ – नवी पेठ – पर्वती

लोकसंख्या – एकूण -७६१११ – अ. जा. १४७८४ – अ. ज. ७५८

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

व्याप्ती: नवी पेठ, पर्वती गावठाण, पर्वती दर्शन वसाहत, अलका टॉकीज, पुना हॉस्पीटल, पत्रकार भवन, वैकुंठ स्मशानभुमी, आनंदबाग हौसिंग सोसायटी, सचिन तेंडूलकर जॉगींग ट्रॅक, राजेंद्रनगर, दत्तवाडी, टिळक स्मारक मंदीर, एस. पी. कॉलेज, अभिनव कला महा विद्यालय, आंबिल ओढा झोपडपट्टी, लोकमान्यनगर, सारसबाग, पेशवे पार्क, निसेन हट सोसायटी, पं. नेहरू स्टेडियम, स्वारगेट पाणी पुरवठा केंद्र, मित्रमंडळ कॉलनी, लक्ष्मीनगर इ.

उत्तर: मुठा नदी संभाजी पुलावरील रस्त्यास जेथे मिळते तेथून दक्षिणपूर्वेस सदर पूलावरील रस्त्याने व पुढे टिळक रस्त्याने छ. शिवाजी रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः टिळक रस्ता छ.शिवाजी रस्त्यास जेथे मिळतो, तेथून दक्षिणेस छ.शिवाजी रस्त्याने केशवराव जेधे चौक ओलांडून पुढे पुणे सातारा रस्त्याने पंचमी हॉटेल जवळ शाहू कॉलेज रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिणः पुणे सातारा रस्ता पंचमी हॉटेल जवळ शाहू कॉलेज रस्त्यास जेथे मिळतो, तेथून पश्चिमेस शाहू कॉलेज रस्त्याने शाहू कॉलेजच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस शाहू कॉलेजच्या पूर्वेकडील हद्दीने पर्वती फॉरेस्टच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरपूर्वेस पर्वती फॉरेस्टच्या हद्दीने व पुढे पूर्वेस सदर हद्दीने पर्वती घरांक १६८/३ जवळील पर्वती टेकडीच्या पुर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने नानासाहेब पेशवे चौक व केंजळे चौक ओलांडून शाहू महाराज उड्डाणपूलाजवळ (पर्वती फलायओव्हर ब्रिज) सिंहगड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सिंहगड रस्त्याने व पुढे नरवीर तानाजी मालुसरे रस्ताने लाल बहादूर शास्त्री रस्त्यास कान्होजी जेधे चौकात मिळेपर्यंत.

पश्चिमः नरवीर तानाजी मालुसरे रस्ता लाल बहादूर शास्त्री रस्त्यास कान्होजी जेधे चौकात जेथे मिळतो, तेथून उत्तरेस लाल बहादूर शास्त्री रस्त्याने मांगीरबाबा रस्त्यास बॅ. नाथ पै चौकात मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस मांगीरबाबा रस्त्याने विजयश्री टॉवर सोसायटीच्या दक्षिणेकडील विठ्ठलराव रोकडे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने म्हसोबा चौकात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने वडाची बागेच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस वडाची बागेच्या दक्षिणेकडील हद्दीने व पुढे घरकुल सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे सरिता नगरी फेज १ च्या उत्तरेकडील हद्दीने मुठा नदीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस मुठा नदीने संभाजी पुलावरील रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: