Dr Siddharth Dhende | सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी माजी उपमहापौर ऑन फिल्ड – प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहाटे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांची पाहणी

HomeBreaking News

Dr Siddharth Dhende | सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी माजी उपमहापौर ऑन फिल्ड – प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहाटे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांची पाहणी

Ganesh Kumar Mule Apr 07, 2026 7:16 PM

RPI | आरपीआयच्‍या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पाठोपाठ फरजाना आयुब शेख यांचाही पक्ष सदस्‍यत्‍वाचा राजीनामा
Safe transport | Dr. Siddharth Dhende | सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

Dr Siddharth Dhende | सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी माजी उपमहापौर ऑन फिल्ड – प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहाटे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांची पाहणी

 

PMC ward 2 – (The karbhari News Service) – पुणे महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे मंगळवारी (दि. ७) पहाटे ऑन फिल्ड होते. पहाटे ५ वाजता पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागपुर चाळ व समता नगर परिसरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीची माहिती घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले. (Pune News)

या पाहणी नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, उपअभियंता राजेंद्र नगरे तसेच कनिष्ठ अभियंता लतिका म्हस्के उपस्थित होते.

या वेळी एम-4, 9, 16, 23, 43 तसेच एल 32, 33 आणि ४४ या विभागांसह नागपुरचाळ मशिद गल्ली, स्वराज मित्र मंडळ परिसर आणि कोकण गल्ली आदी भागांची तपासणी करण्यात आली. पाहणी दरम्यान हाऊसिंग बोर्डमधील अनेक घरांमध्ये पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असल्याचे, तसेच अनेक ठिकाणी नळ सतत सुरू ठेवले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन इतर नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले.

तसेच काही सोसायट्यांमध्ये पाणी गाड्या धुण्यासाठी आणि उद्यान कामासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले. नागपुरचाळ परिसरात काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक कनेक्शन घेतलेले असून बाहेर नळांमधून पाणी वाहत राहणे, टाक्या भरून वाहून जाणे अशा प्रकारांमुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले.

या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी पाणी जपून आणि जबाबदारीने वापरण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि नगरसेविका नंदिनी धेंडे यांच्या वतीने करण्यात आले. “प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळल्यास सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो,” असे आवाहन नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: