PMC Ward 17 | हडपसर–मांजरी परिसरातील विकासकामे, अतिक्रमण आणि वाहतूक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी

Homeadministrative

PMC Ward 17 | हडपसर–मांजरी परिसरातील विकासकामे, अतिक्रमण आणि वाहतूक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी

Ganesh Kumar Mule Jul 21, 2026 8:05 PM

PMPML News | पीएमपीएमएलकडे १५५१९ पैकी ८०५१ पदे रिक्त!
Maharashtra School Timing | राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरणार | राज्य सरकारचे आदेश जारी
PMC Health Department | किटकजन्य आजारांचा विळखा सैल! | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश 

PMC Ward 17 | हडपसर–मांजरी परिसरातील विकासकामे, अतिक्रमण आणि वाहतूक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी

मेट्रोच्या कामापूर्वी नियोजनासाठी प्रशासनाची पूर्वतयारी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक 17 हडपसर–मांजरी परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. आगामी काळात या परिसरात मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करण्याच्या उद्देशाने ही पाहणी आयोजित करण्यात आली होती. (Pune Municipal Corporation News)

स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सातत्याने सूचना आणि तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीसाठी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक महामेट्रो आशुतोष झा, हडपसर–मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष प्रशांत तुपे, सभासद डॉ. दादा कोद्रे, अजित घुले, सरिता घुले, पायल तुपे, नंदाताई अबनावे, मारुती तुपे, उपायुक्त परिमंडळ 4 अरविंद माळी, उपायुक्त भूसंपादन निखिल मोरे, उपायुक्त अतिक्रमण सोमनाथ बनकर, उपायुक्त मालमत्ता प्रशांत ठोंबरे, अधीक्षक अभियंता पथ विभाग अजय वायसे, महापालिका सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान परिसरातील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्थापन, बेकायदेशीर अतिक्रमण, पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

तसेच मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: