PMC Ward 12 – Chhatrapati Shivajinagar – Model Colony | प्रभाग क्रमांक – १२ – छ. शिवाजी नगर – मॉडेल कॉलनी | प्रभागात येणारे शहरातील परिसर आणि प्रभागाची सविस्तर माहिती जाणून घ्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक १२ मध्ये पुणे मनपा भवन, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय, मॉडेल कॉलनी असे विविध परिसर आणि महत्वाचे भाग येत आहेत. प्रभागाची रचना, नैसर्गिक हद्दी आणि लोकसंख्या अशी सर्व माहिती आपण जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC)
प्रभाग क्रमांक – १२ – छ. शिवाजी नगर – मॉडेल कॉलनी
लोकसंख्या -एकूण – ७७६६९ – अ. जा.-९४८९ – अ. ज. ८६९
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: हनुमान नगर, वडारवाडी, कमला नेहरु पार्क, बी.एम.सी.सी. कॉलेज, लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, संभाजी उद्यान, पुणे मनपा भवन, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय, इंजिनिअरींग कॉलेज पुणे, पुणे जिल्हा न्यायालय, पुलाची वाडी, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर पोलीस ग्राउंड, पोलीस लाईन, मॉडेल कॉलनी, सिव्हील कोर्ट मेट्रो सेशन इ.
उत्तर: पुणे विद्यापीठ रस्ता (गणेश खिंड रस्ता) गोखले रस्त्यास जेथे मिळतो. तेथून दक्षिणपूर्वेस पुणे विद्यापीठ रस्त्याने वीर चाफेकर चौकात साखर संकुलच्या पूर्वेकडील रस्त्यास (के.बी. जोशी पथ) मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने पुणे- मुंबई रेल्वे लाईनला मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस पुणे मुंबई रल्वे लाईनने संचेती हॉस्पिटल जवळील एच. के. फिरोदीया पूलावरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात पुणे मुंबई रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पुणे मुंबई रस्त्याने पाटील इस्टेट जवळील संगमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मुळा नदीस मिळेपर्यंत, तेथून पुर्वेस मुळा नदीने मुठा नदीस मुळा मुठा संगम जवळ मिळेपर्यंत.
पुर्व: मुळा नदी मुठा नदीस मुळा मुठा संगम जवळ जेथे मिळते, तेथून दक्षिणपश्चिमेस मुठा नदीने संभाजी पूलावर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यास मिळेपर्यंत.
दक्षिण: मुळा नदी मुठा नदीस मुळा मुठा संगम जवळ जेथे मिळते, तेथून दक्षिणपश्चिमेस मुठा नदीने संभाजी पूलावर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यास मिळेपर्यंत.
मुठा नदी संभाजी पूलावर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यास जेथे मिळते तेथून उत्तरेस फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने भांडारकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस भांडारकर रस्त्याने प्रभात रोड गल्ली क्र. ७ ला मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस गल्ली क्र. ७ ने प्रभात रस्त्यास गुरु रोहिणी भाटे चौकात मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस प्रभात रस्त्याने विधी महाविद्यालय रस्ता ओलांडून पुढे विधी महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील हद्दीने हनुमान टेकडी व विधी महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील सामाईक हद्दीस मिळेपर्यंत.
पश्चिमः विधी महाविद्यालयाची दक्षिणेकडील हद्द हनुमान टेकडी व विधी महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील सामाईक हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस सदर सामाईक हद्दीने व पुढे उत्तर पूर्वेस बालभारतीच्या पश्चिमेकडील हद्दीने व पुढे उत्तरेस सेनापती बापट रस्त्याने पानकुंवर फिरोदिया रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने गोखले रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस गोखले रस्त्याने पुणे विद्यापीठ रस्त्यास (गणेश खिंड रस्त्यास ) मिळेपर्यंत.

COMMENTS