PMC Transgender Employees | तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका सकारात्मक!

HomeपुणेBreaking News

PMC Transgender Employees | तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका सकारात्मक!

गणेश मुळे Feb 07, 2024 8:36 AM

PMC Pune Chief Engineer | नंदकिशोर जगताप यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीकडून शिफारस!
PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!
E Rickshaw | Pune Municipal Corporation | दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य | पालकमंत्री

PMC Transgender Employees | तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका सकारात्मक!

| सुरक्षा विभागाकडून ठेवला जाणार प्रस्ताव

PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation (PMC) सेवेत 25 तृतीयपंथी व्यक्तींना (PMC Transgender Employees) कंत्राटी सेवक  म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.  पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी. या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले गेले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांना शहरात भाड्याने घर दिले जात नाही. त्यामुळे या कमर्चाऱ्यांना महापालिकेच्या चाळ विभागाकडील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सुरक्षा विभागाच्या वतीने आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. अशी माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (Rakesh Vitkar PMC) यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)

महापालिकेने तृतीय पंथीयांना नोकरी दिली आहे.  यामध्ये पीएचडी, एमटेक, बीएस्सी शिक्षण झालेल्या तृतीय पंथियांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, व्हेईकल डेपो, मनपा भवन अशा ठिकाणी सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली आहे. शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.  (Pune Municipal Corporation News)

The Karbhari- pmc transgender Employees

तृतीयपंथी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.

त्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा विभागात काम करणाऱ्या तृतीय पंथीय कर्मचाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक पार पडली.  आढावा बैठकीमध्ये या तृतीयपंथीयांनी त्यांचा गेल्या आठ महिन्यातील अनुभव कथन केला. त्याचनुसार काही अडचणी देखील त्यांनी मांडल्या. त्यांच्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने कमला नेहरू हॉस्पिटल मंगळवार पेठ येथे उपचाराकरिता एक स्वतंत्र  वार्डउपलब्ध करून देण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे काही तृतीयपंथीयांना हार्मोनचे इंजेक्शन करिता वैद्यकीय मदत हवी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे या सर्व तृतीयपंथीयांना निवासाकरिता महानगरपालिकेकडील चाळ विभागांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सदनिका मेळाव्यात असे त्यांनी मागणी केलेली आहे. त्यानुसार सदनिका देण्याबाबत महापालिका सकारात्मक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला जाणार आहे.