PMC Tharkude Hospital | पुणे महानगरपालिकेच्या थरकुडे दवाखान्यात CPR मुळे रुग्णाला मिळाले पुनर्जीवन | वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश 

Homeadministrative

PMC Tharkude Hospital | पुणे महानगरपालिकेच्या थरकुडे दवाखान्यात CPR मुळे रुग्णाला मिळाले पुनर्जीवन | वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश 

Ganesh Kumar Mule Nov 21, 2025 8:48 PM

Refined Oil | Weight Loss Tips | तुम्ही स्वयंपाकासाठी रिफाइंड तेल वापरता का? | ते वापरणे सोडल्यास तुमच्या शरीर आणि वजनात काय फरक पडतो? | जाणून घ्या
World Health Day | जागतिक आरोग्य दिन 2024 : जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि इतिहास 
World Health Day 2024 Hindi Summary : विश्व स्वास्थ्य दिवस 2024: विश्व स्वास्थ्य दिवस क्यों मनाया जाता है?  जानिए महत्व और इतिहास

PMC Tharkude Hospital | पुणे महानगरपालिकेच्या थरकुडे दवाखान्यात CPR मुळे रुग्णाला मिळाले पुनर्जीवन! | वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश

 

Cardiac Arrest – (The Karbhari News Servcie) – पुणे महापालिकेच्या  थरकुडे दवाखान्यात ओपीडीला तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला हार्ट अटॅक आला असता थरकुडे दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी शहा  (Dr Shubhangi Shah) व त्यांच्या नर्सिंग स्टाफने योग्य रित्या CPR देऊन त्यांचे बंद पडलेले हृदय पुन्हा चालू करून रुग्णाला जीवनदान दिले. यामुळे महापालिकेच्या दवाखान्यावरील विश्वास वाढीस लागला असून डॉ. शहा व थरकुडे दवाखान्यातील संपूर्ण नर्सिंग स्टाफ वर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Pune Corporation Hospitals)

हार्ट अटॅक आल्याचे डॉक्टरांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे व त्यांच्या कौशल्यामुळे आणि त्यांच्या स्टाफने दाखवलेल्या तत्परतेमुळे रुग्णाचा जीव वाचून रुग्णाला योग्य वेळेत मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुढील उच्चारासाठी ऍडमिट करण्यात आले. गोल्डन हवर मध्ये योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचतो. हे या निमित्ताने पाहायला मिळाले.

याबाबत डॉक्टर शहा यांनी सांगितले कि, छातीत दुखू लागल्याने ४० वर्षाचा एक व्यक्ती आमच्या दवाखान्यात आला होता. दवाखान्यात आल्यावर त्यांच्या छातीतील दुखणे वाढले. त्यांची ती स्थिती पाहून आम्ही तत्काळ त्यांना औषधे दिली. आम्हाला लक्षात आले कि हा cardiac arrest आहे. आम्ही त्या रुग्णाच्या नातेवाईकांना याविषयी सांगितले. तसेच तत्काळ उपचार अर्थात CPR देणे देखील सुरु ठेवले. आमच्या कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्या व्यक्तीच्या सुदैवाने आम्ही त्या रुग्णाला जीवदान दिले आणि पुढील उपचारासाठी त्या व्यक्तीच्या नातेवाईकां सोबत ससून हॉस्पिटल ला पाठवले. त्यानंतर देखील आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. आता त्या रुग्णाची तब्येत चांगली सुधारली आहे.

याच प्रकारे कधी कोणा समोर अशी परिस्थिती आल्यास, आपण मानसिकता ठाम ठेऊन BASIC LIFE SUPPORT च्या प्रोटोकॉल चा वापर करून , CARDIAC ARREST मध्ये गेलेल्या रुग्णाला जीवनदान देऊ शकतो हे लक्षात घेऊन CPR परफॉर्म करावा.

| डॉ शुभांगी शहा, वैद्यकीय अधिकारी, थरकुडे दवाखाना, पुणे मनपा. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: