PMC Tender | विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन केलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी     | ठेकेदाराची कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली असल्याचा तुषार पाटील यांचा आरोप 

Homeadministrative

PMC Tender | विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन केलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी   | ठेकेदाराची कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली असल्याचा तुषार पाटील यांचा आरोप 

Ganesh Kumar Mule Apr 01, 2025 8:26 PM

Pune Timber Market Fire | टिंबर मार्केट येथील दुकाने स्थलांतरित करण्याबाबत विचार | महापालिका आयुक्तासोबत लवकरच बैठक 
Residence to Ministers | राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप
Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

PMC Tender | विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन केलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

| ठेकेदाराची कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली असल्याचा तुषार पाटील यांचा आरोप

 

Tushar Patil BJP – (The Karbhari News Service) –  २०२४-२५ करिता शालेय स्वछता साहित्य (लिक्विड Acid, Pheynl) खरेदी करणे व हार्डवेअर साहित्य खरेदी प्रक्रिया प्रशासनाने राबवली. मात्र निविदाची छाननी एक विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन केली असल्याचा आरोप भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केला आहे. तसेच सदर निविदा एकच ठेकेदाराने संगमताने भरलेली असून ही कागदपत्रावरून सिद्ध होत असून सदर पात्र ठेकेदराचे कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली आहे. त्यामुळे  निविदा प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने स्थायी समिती मध्ये मान्यता न देता तात्काळ रद्द करणेची मागणी पाटील यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)

तुषार पाटील यांच्या निवेदना नुसार  मध्यवर्ती भांडार कार्यालयामार्फत सन २०२४-२५ करिता पुणे मनपाच्या प्राथमिक शिक्षण शाळांसाठी निविदा प्रक्रिया निविदा क २३ शिक्षण०९-२०२४-२५ दिनांक २९-०१-२०२५ ते ०४-०२-२०२५ (अंदाजे र.रु ५० लक्ष) व निविदा क्र २४शिक्षण-१०-२०२४-२५ दिनांक ०५-०३-२०२५ ते ११-०३-२०२५ ( अंदाजे र.रु ५० लक्ष) रोजी प्रसिद्ध केली होती. सदर निविदेची छाननीअंदाजे २ महिने पेंडिंग ठेऊन मार्च अखेर दिनांक २५/०३/२०२५ रोजी उघडण्यात आल्या आहे. सदर कामामध्ये सर्व चुकीच्या अटी शर्ती व अर्धवट स्पेसिफिकेशन ज्याला IS Standard नुसार कुठेही नमूद नसून मोगम स्पेसिफिकेशन लावले आहेत. या बाबत तक्रार दिनांक ३१/०१/२०२५ रोजी केली होती. तथापी उप आयुक्त मध्यवर्ती भांडार यांनी अद्यापपर्यंत उत्तर न देता परस्पर टेंडर उघडले असून  खातेप्रमुख यांनी महापालिका आयुक्त ठराव क्र ६/४५३ दिनांक ०८/०९/२०२२ कलम४.७ अन्वये निविदा प्रकरणात शासन स्तरावर सर्वमाधारण व्यक्ती / लोक प्रतिनिधी यांची तक्रार प्राप्त झाल्यास  महानगरपालिकाआयुक्त /  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांचेमार्फत अहवाल सादर करण्यात यावा व इतर बाबतीत खातेस्तरावर निविदा क्रबाबत माहिती अहवान संबंधीताना दिला जावा. असे नमूद असून देखील खातेप्रमुख यांनी त्या नियमांचे उल्लघन केले आहे. त्यानुसार आम्ही सर्व निविदाधारकाची कागदपत्रे ऑनलाईन बघितले असता सदर निविदेमध्ये काही ठेकेदार पात्र होत असतानादेखील त्यांना ठेकेदाराच्या संगनमताने अपात्र केले आहे.  कोलेक्स इंडस्ट्रीज व  बसव इंडस्ट्रीज जे निविदाधारक पात्र केलेले आहेत्यांचे खात्याने प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्ती नुसार काही कागदपत्रे अटी व शर्ती नुसार नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या पूर्वी पुणे मनपाच्या मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मागणीनुसार सन २०१८-१९ सालासाठी देवाची उरूळी फुरसुंगी कचरा डेपो परिसरात फवारणी करीता माशी प्रतिबंधक इमिडाक्लोरोप्रिड (0.5 RB) डी. डी.व्ही.पी.(डायक्लोरेंस 76% ई.सी.) व सायपोनोथ्रीन (5% ई.सी.) पुरविणे या कामी मे. कोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे श्री. स्वामिनाथ कोळळे याठेकेदाराने मध्यवर्ती भांडार कार्यालयकडील अधिकारी यांचे फसवणूक व दिशाभूल करून पुणे महानगरपालिकेचे र.रु 36,00,000/- चेविना परवाना व बोगस पावडर पुरवून आर्थिक नुकसान केले असून तसेच कीटकनाशक कायदा 1968 मधील भाग 3 के, 13 (1), 17 व 18व कीटकनाशक नियम 1971 मधील नियम 10,18 व 19 चा भंग केला असून त्यांच्या वर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनियमानुसार कडक कारवाई करणेस, पुणे महापालिकेची फसवणूक केल्यामुले त्यांच्या गुन्हा दाखल करून काळयायादीत टाकणेउप आयुक्त मध्यवर्ती ‘भांडार यांना दिनांक १५/०१/२०२५ व दिनांक ०६/०३/२०२५ रोजी पत्र दिल असता अद्याप कुठलेही कार्यवाहि नकरता व ३६ लाखाची रक्कम वसूल न करता सदरचे दोन्ही टेंडर  कोलेक्स इंडस्ट्रीज यांना देण्याची शिफारस बेकायदेशीर पणे केली आहे.

१. कोलेक्स इंडस्ट्रीज व  बसव इंडस्ट्रीज यांना पात्र केले आहे त्यांचे कागदपत्रे अपूर्ण असताना देखील सदर बाब आपल्या स्कुटिनी शीट व जोडलेल्या कागदपत्रानुसार दिसून येत असून सदर निविदाधारकांना कुठल्या नियमानुसार पात्र केले आहे याची चौकशी दक्षता विभागामार्फत करावी यावी.
२. निविदेमध्ये परिशिष्ट क अट क्रमांक १६ मध्ये व मा.महापालक आयुक्त ठराव क्र ६/४५३ दिनांक ०८/०९/२०२२ नुसार “तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अथवा जोडलेल्या विवरणामध्ये काही शंका असल्यास संबंधीत कंत्राटराकडून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे, अश्या प्रकरणी पूरक विवरणे / प्रमाणपत्रे तसेच जास्तीची माहिती प्राप्त करून ती अभिलेखावर ठेवावी व तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपुरी आहे या कारणास्तव कंत्राटदारास अपात्र ठरवू नये. तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपूर्ण असल्यास ती वरीलप्रमाणे विशिष्ट कालावधीत (८ / १५ दिवस) उपलब्ध करून देण्याची संधी देण्यात यावी व याकरीता कंत्राटदार असमर्थ ठरल्यास नंतर त्यास अपात्र ठरवावे व तसे त्यास लेखी कळवून नंतर अन्य निविदा उघडण्याची कार्यवाही करावी असे नमूद असून देखील खात्याने इतर निविदाधारकांना पत्र न देता नियमबाह्य कार्यवाही केलेली दिसून येते व निविदेमधील अट क्रमांक १६ व मा. महापालिका आयुक्त ठराव क्र ६४५३ दिनांक ०८/०९/२०२२ कलम ४.८.१ चे उल्लंघन झाल्याचे दिसते.
३. आपल्या निविदेमध्ये अट क्रमांक १६ मध्ये व मा. महापालिका आयुक्त ठराव क्र ६/४५३ दिनांक ०८/०९/२०२२ नुसार “निविदेच्या तांत्रिक लिफाफ्यातील माहितीचे निराकरण कंत्राटदारास पूर्ण संधी देऊन जास्तीची माहिती मागवून व त्यात कंत्राटदार पात्र ठरत असल्यास ही माहिती अभिलेखावर ठेवून आर्थिक निविदा लिफाफा उघडणे व स्पर्धात्मक दर प्राप्त होण्यास बाब निर्माण करणे” असे नमूद असून देखील खात्याने नियमबाह्य कार्यवाही केलेली दिसून येते व निविदेमधील अट क्रमांक १६ व मा. महापालिका आयुक्त ठराव क्र ६/४५३ दिनांक ०८/०९/२०२२ कलम ४.८.१ चे उल्लंघन झाल्याचे दिसते.
४. मा. महापालिका आयुक्त यांचे कार्यालयाकडील पत्र जावक क्र मआ/ ३८८९ दिनांक २८/०६/२०१९ अन्वये अ.क्र “क” मध्ये व शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/२४/कोषा प्रशा-५, दि. १४.०२.२०२४ नुसार सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षांत दि. १५ फेब्रुवारी, २०२५ तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजूरी देऊ नये असे नमूद असून देखील व ऑडिट विभागाने आक्षेप घेतले असून देखील खातेप्रमुख यांनी मोगम उत्तर देऊन नियमबाह्य कार्यवाही केलेली दिसून येते व  आयुक्त व  शासनाचे आदेशाचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे दिसून येते आहे.
५. मध्यवर्ती भांडार कार्यालय कडील अधिकारी  वरिष्ठ लिपिक व  कार्यकारी अभियंता यांना इतर निविदाधारकेला अपात्र का केले व पात्र निविदाधारक अपात्र होत असून त्यांना पात्र का केले असे विचारले बसता ? त्यांनी सांगितले कि सदर स्क्रूटिनी ही घाईघाईत केली असून व ती चुकली असून आमच्यावर खूप दबाव आहे असे सांगून व खातेप्रमुख यांनी दिलेले आदेशानुसार सद पात्र / अपात्रची कार्यवाही केली आहे असे सांगण्यात आले आहे. निविदा क्र २३ शिक्षण०९-२०२४-२५ व निविदा क्र २४ शिक्षण – १०-२०२४-२५ हे दोन्ही निविदा बेकायदेशीर व मनमानी कारभाराने राबवून एक विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन व सदर निविदा एकच ठेकेदाराने संगमताने भरलेली असून ही कागदपत्रावरून सिद्ध होत असून सदर पात्र ठेकेदराचे कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली असून सदर दोन्ही निविदेमध्ये नियमबाह्य काम केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास स्पष्टपणे येत असून सदर दोन्ही निविदेची तांत्रिक छाननी आपण त्रयस्थ विभागामार्फत करण्यात यावे व त्यामध्ये अधिकारी दोषी आढळ्यास त्यांच्यावर नियमबाह्य काम केल्यामुळे मनपा नियमानुसार निलंबनाची कार्यवाही त्वरित करावी व सदर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी.

६. निविदा क २३ – शिक्षण -०९-२०२४-२५ बसव इंडस्ट्रीज यांनी त्यांचे दर ‘अ’ पाकीट मध्ये ०.६०% कमी दर सादर केले असून सदर बाब नियमबाह्य आहे व या पूर्वी मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत याच कामासाठी अशी स्थिती निर्माण आली असता अ पाकिटात दर सादर करता येत नाही त्यानुसार त्याची दखल घेऊन सदर निविदाधारकेला अपात्र केले होते.
७. निविदा क्र २३ शिक्षण-०९-२०२४-२५ व निविदा क २४ शिक्षण-१०-२०२४-२५ ची छाननी संशयास्पद करणारी असून अर्थात खात्यानेच ठरविलेले नियम खात्यानेच एक विशिष्ठ ठेकेदारासाठी डावलयाचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, आमच्या पत्राची दखल तातडीने घेण्यात यावी. आयुक्त यांना दोन्ही टेंडर मध्ये झालेले घोळ अद्याप पर्यंत माहिती नसून खातेप्रमुख यांनी फाईल स्थायी समिती मध्ये मान्य व्हावी यासाठी धडपड सुरु केली असून ऑडीट व दक्षता विभागाने काढलेले आक्षेप याची तपासणी करून व खात्याने पात्र ठेकेदराचे कागदपत्रे अपूर्ण असून देखील त्यांची निविदा पात्र केली असून सदर दोन्ही निविदेमध्ये नियमबाह्य काम केल्याचे असल्याने आयुक्त यांना  विनंती आहे कि सदर टेंडरची चौकशी करून स्थायी समितीमध्ये मान्यता न देता त्वरित रद्द करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर मनपा अधिनियम नुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.