PMC Superintendent Engineer | अभियांत्रिकी संवर्गातील ५ अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती! 

Homeadministrative

PMC Superintendent Engineer | अभियांत्रिकी संवर्गातील ५ अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती! 

Ganesh Kumar Mule Sep 16, 2025 4:18 PM

PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक
PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक  | कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो? 
PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

PMC Superintendent Engineer | अभियांत्रिकी संवर्गातील ५ अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती!

– शहर सुधारणा समितीने दिली मान्यता

 

PMC Employees Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील ५  अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) वर्ग १ या पदावरून अधिक्षक अभियंता वर्ग १ (S 25) या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर याबाबतचे आदेश जारी करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिका सेवाप्रवेश नियमानुसार अधिक्षक अभियंता या पदासाठी १००% पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती अशी नेमणुकीची पद्धत आहे. पुणे महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार अधीक्षक अभियंता पदाच्या एकूण १२ जागा आहेत. या सर्व जागा १००% पदोन्नतीने भरायच्या आहेत. रोस्टर नुसार यातील 7 जागा भरण्यात आली आहेत तर ५ जागा रिक्त आहेत.

या जागा भरण्यासाठी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बढती समितीने पात्र अधिकाऱ्यांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर केली.

त्यानुसार निवड यादीत 5 अधिकारी आहेत. त्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. यामध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

1. अभिजित आंबेकर

2. ललित बेंद्रे

3. राजेंद्र जाधव

4. प्रवीण शेंडे

5. भाऊसाहेब शेलार

तर प्रतिक्षा यादीत यांचा समावेश आहे.

1. नितीन देशपांडे

2. दिनेशकुमार गिरोल्ला

3. सुनील यादव

——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0