PMC Municipal Secretary Department | नगरसचिव कार्यालयातील बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना स्पेशल पे + मोपेड भत्ता | स्थायी समितीने दिली मंजुरी

Homeadministrative

PMC Municipal Secretary Department | नगरसचिव कार्यालयातील बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना स्पेशल पे + मोपेड भत्ता | स्थायी समितीने दिली मंजुरी

Ganesh Kumar Mule Jul 20, 2026 7:49 AM

PMC Superintendent Promotion | पदोन्नती मिळालेल्या 48 अधीक्षकांना अखेर दिली जाणार पदस्थापना | पदस्थापनेची कार्यवाही उद्या केली जाणार
Ramdas Athavale | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या दरबारात! | मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार! 
Protest Against Health Department : महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने 

PMC Municipal Secretary Department | नगरसचिव कार्यालयातील बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना स्पेशल पे + मोपेड भत्ता | स्थायी समितीने दिली मंजुरी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयात कार्यरत असलेल्या बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना आता नियमित टपाल शिपायांप्रमाणेच स्पेशल पे आणि मोपेड भत्ता मिळणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (PMC Standing Committee)

नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, नगरसचिव कार्यालयात कार्यरत बाहेरील खात्याचे टपाल शिपाई हे कार्यालयातील नियमित टपाल शिपायांप्रमाणेच समान स्वरूपाचे काम करतात. विविध कार्यालयांमध्ये टपाल पोहोचविणे, पत्रव्यवहाराची ने-आण करणे, मा. सभासदांना सर्व समित्यांचे टपाल वाटप करणे आणि इतर संबंधित जबाबदाऱ्या त्या पार पाडतात.

मात्र समान स्वरूपाचे काम करूनही बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना नगरसचिव कार्यालयातील टपाल शिपायांप्रमाणे स्पेशल पे + मोपेड भत्ता मंजूर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे “समान कामासाठी समान लाभ” या तत्त्वानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना मोपेड भत्ता मंजूर करणे न्याय्य आणि आवश्यक असल्याचे मत प्रस्तावात मांडण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, नगरसचिव कार्यालयात समान स्वरूपाचे टपाल वितरणाचे काम करणाऱ्या बाहेरील खात्याच्या टपाल शिपायांना लागू असलेल्या नियम व अटींनुसार नगरसचिव कार्यालयातील टपाल शिपायांप्रमाणे स्पेशल पे + मोपेड भत्ता मंजूर करण्याबत सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेण्यात यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

स्थायी समितीने या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करून त्याला मंजुरी दिली आहे. यामुळे आता बाहेरील खात्यातून नगरसचिव कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आलेल्या टपाल शिपायांनाही नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे आर्थिक लाभ मिळणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0