PMC Standing Committee | स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आज अस्तित्वात येणार  | आजच्या विशेष सभेत निवडले जाणार सदस्य

Homeadministrative

PMC Standing Committee | स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आज अस्तित्वात येणार | आजच्या विशेष सभेत निवडले जाणार सदस्य

Ganesh Kumar Mule Feb 13, 2026 8:40 AM

PMC Chief Engineer | महापालिकेत आता मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी अनुभवाची अट 5 वरून 3 वर्षांवर!
PMC on Coaching Classes | शहरातील खासगी क्लासेसचे पुणे महापालिका करणार फायर ऑडिट!
PMC Chief Engineer Promotion | पुणे महापालिकेत मुख्य अभियंता पदाच्या अर्हतेत बदलाचा प्रस्ताव | अनुभवाच्या अटीत केली जाणार सुधारणा

PMC Standing Committee | स्थायी समिती सह सर्व विषय समित्या आज अस्तित्वात येणार

| आजच्या विशेष सभेत निवडले जाणार सदस्य

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे सभागृह ४ वर्षानंतर अस्तित्वात आले आहे. नुकतेच महापौर आणि उपमहापौर देखील निवडण्यात आले आहेत. आता स्थायी समिती आणि सर्व विषय समित्या अस्तित्वात येणार आहेत. आजच्या विशेष सभेत ३ वाजता या समित्यांचे सदस्य निवडले जाणार आहेत. त्यानंतर समित्यांच्या विशेष सभेत प्रत्येक समितीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (PMC Special General Body Meeting)

एकूण ६ समित्या अस्तित्वात येणार आहेत.

१. स्थायी समिती
२. शहर सुधारणा समिती
३. महिला बाल कल्याण समिती
४. क्रीडा समिती
५. शिक्षण समिती
६. विधी समिती

स्थायी समिती मध्ये १६ सदस्य असतील तर बाकी ५ समित्यांमध्ये १३ सदस्य असणार आहेत.

पक्षीय बलाबल नुसार स्थायी समितीत भाजपचे १२, राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेस चा एक सदस्य असेल. तर इतर ५ समित्यांमध्ये भाजप १०, राष्ट्रवादी २ आणि कांग्रेस चा एक सदस्य असेल.

सदस्य निवडीसाठी ९ तारखेला विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा तहकूब करण्यात आली होती. आता ही तहकूब सभा आज दुपारी ३ वाजता होणार आहे. यात हे सदस्य निवडले जाणार आहेत. आपल्या बलाबल नुसार प्रत्येक पक्ष आपल्या सदस्यांची नावे महापौर आणि आयुक्त यांच्याकडे देतील. त्यानुसार महापौर सदस्य निवडीची नावे जाहीर करतील. सदस्य निवडल्यानंतर प्रत्येक समितीची विशेष सभा होईल. त्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्त केला जातो. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पार पडेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: