PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग दिन साजरा!

Homeadministrative

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग दिन साजरा!

Ganesh Kumar Mule Dec 03, 2024 7:33 PM

Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम
World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन 
International Divyang Day | पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग दिन साजरा!

 

Divyang Day – (The Karbhari News Service) – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष मुलांची शाळा क्र. 14 बी,शिवाजीनगर गावठाण, पुणे या शाळेत जागतिक दिव्यांग दिन निमित्त बालमेळावा आयोजित करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. (Pune Municipal Corporation – PMC)

विशेष मुलांनी बनविलेल्या दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमामधून मिळालेल्या रक्कमेतून या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व टिफिन बॅग चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पुणे मनपा शिक्षण विभाग व समाज विकास विभाग , उपायुक्त  नितीन उदास  यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा प्रशासकीय अधिकारी मा. सुनंदा वाखारे मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

याप्रसंगी उपप्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे व सुरक्षा अधिकारी राकेश विटकर उपस्थित होते यांनी विघार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . विशेष शाळेच्या शाळाप्रमुख व शाळेतील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0