PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात अजून येणार 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल!

HomeBreaking Newsपुणे

PMC Solid Waste Management Special Scod Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात अजून येणार 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल!

गणेश मुळे Mar 05, 2024 2:56 AM

PMC Solid Waste Management Bylaws | कचरा जाळणे, ओला-सुका कचरा वेगळा न करणे आता नागरिकांना पडणार महागात! |  दंडाच्या रकमेत प्रचंड वाढ 
4 special scod vehicles will come in the fleet of PMC solid waste department!
PMC Solid Waste Management Special Scod Vehicle | स्पेशल स्कॉड व्हेईकल चा दुहेरी फायदा : कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढलं.. कर्मचारी गांधीगिरी करू लागले… आणि लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली

PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात अजून येणार 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल!

| जनजागृती आणि दंडात्मक कारवाईला मिळणार बळ

Pune – (The Karbhari News Service) – PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle  | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दी मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली (PMC Solid Waste Management Bylaws) लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध कारवाई करणेकरिता भरारी पथकाच्या दळणवळण साठी व दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल (Special Scod vehicle) ची खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अजून 4 गाड्या घेण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. यासाठी 34 लाख 83 हजारांचा खर्च येणार आहे.  आगामी काळात अजून 10 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पूर्वी घेतलेल्या 4 गाड्या दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणाऱ्या ४ क्षेत्रीय कार्यालय म्हणजे हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालय (PMC Hadapsar Mundhva Ward office), कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय (PMC Kothrud Bavdhan Ward office),  नगररोड- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय (PMC Nagarrod Vadgaonsheri Ward office) आणि  प्लास्टिक स्कॉड मुख्य मनपा भवन (Plastic Scod PMC bhavan) कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत. (PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle)
पुणे शहरात दैनंदिन कचरा निर्मिती (PMC Garbage Collection) २२०० ते २३०० मे. टन पर्यंत होत आहे. दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकरिता केंद्र ल शासनामार्फत घनकचरा हाताळणी नियमावली २०१६ (PMC Solid Waste Management Bylaws 2026) निर्गमित केले आहे. नियमावली नुसार घनकचरा व्यवस्थापन निगडीत विविध नियमांचे पालन करणेकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वेळोवेळी कारवाई करणे अनिवार्य आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॅन, क्रॉनिक स्पॉट, अॅटी स्पिटिंग, ओपन डम्पिंग, वेस्ट बर्निंग इ स्वरूपाच्या विविध कारवाईचा समावेश आहे. तसेच नव्याने समाविष्ठ ३४ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (Pune PMC News)
विविध कारवाई करणेकरिता दैनंदिन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे. या करिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दळणवळण करिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत सेवकांना त्यांचेकडील दुचाकी वाहनावर जाऊन कारवाई करावी लागते जेणेकरून कारवाई प्रभावी रित्या होत नाही तसेच मुख्य खात्याकडे देखील मोठ्या कारवाया करणेकरिता वाहन उपलब्ध होत नाही.

 कारवाई करणेकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास एक व मुख्य खात्यास तीन असे एकूण १८ वाहन खरेदी करण्यात येणार असून पुणे शहरामध्ये विविध स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध कारवाया प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान मध्ये देखील पुणे शहराचे मानांकन वाढविणे करिता या उपक्रमअंतर्गत मदत होणार आहे. तसेच सेवकांना कारवाई करिता वाहने उपलब्ध करून दिल्यास त्यांचे मनोबल वाढून कारवाई प्रभावी रित्या होणेस मदत होईल व त्याचे दुरोगामी चांगले परिणाम होतील. त्यामुळे गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करणे करिता पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पहिल्या टप्यात ४ गाड्या घेण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्यात अजून 4 गाड्या घेण्यात येतील. महापालिका अधिनियम 5 2 (2) नुसार महिंद्रा अँड महिंद्रा लि. या कंपनी कडून या गाड्या घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक गाडीला 8 लाख 70 हजार असा खर्च येणार असून एकूण खर्च हा 34 लाख 83 हजार इतका आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.