PMC Social Devlopment Department | १० वी १२ वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ९५८४ अर्ज पात्र तर विविध कल्याणकारी योजनांसाठी १४२११ अर्ज पात्र!
| समाज विकास विभागाची माहिती
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. तसेच विविध कल्याणकारी योजनासाठी देखील अर्ज मागवले होते.
सुरुवातीला १ ऑगस्ट पासून ते ३१ डिसेंबर या कालावधी पर्यंत यासाठी कालावधी देण्यात आला होता. मात्र मधील काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे यास मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली होती. २५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
|शिष्यवृत्ती योजनासाठी ९ हजार ५८४ अर्ज पात्र
दरम्यान या दोन्ही म्हणजे १० वी आणि १२ वी शिष्यवृत्ती योजनासाठी एकूण ११ हजार २९२ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यातील ८ हजार ५५४ हे १० वी च्या योजनेसाठी तर २ हजार ३७८ हे १२ वी च्या योजनेसाठी आले आहेत. यातील ९ हजार ५८४ अर्ज हे पात्र करण्यात आले आहेत. तर कागदपत्रांच्या अभावी ११६३ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. दरम्यान ५४३ अर्ज हे प्रलंबित आहेत. यावर प्रक्रिया सुरु असून यातील काही अर्ज पात्र होऊ शकतात. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
| विविध कल्याणकारी योजनांसाठी एकूण १७२७७ अर्ज
१० वी १२ वी शिष्यवृत्ती योजने सहित विविध कल्याणकारी योजनाना देखील मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याण योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजना यांचा समावेश आहे. या योजनांसाठी एकूण १७ हजार २७७ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यातील १४२११ एवढे अर्ज पात्र करण्यात आले आहेत. तर २२११ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. तसेच ७८९ अर्ज हे प्रलंबित आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS