PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

HomeपुणेBreaking News

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

Ganesh Kumar Mule Sep 14, 2023 2:00 AM

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 
PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 
Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

PMC Sky Sign Department | पुणे – नियमांचे उल्लंघन करून टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग (Hoardings) उभारणीचे काम सुरू होते. मात्र त्याकडे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन परवाना निरीक्षकांचे (Licence Inspector) निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. यामध्ये परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचा समावेश आहे. (PMC Sky Sign Department)
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे (Pune Municipal Corporation Sky Sign Department) संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात संभाजी पोलिस चौकीच्या (Sambhaji Police Chowki) मागे उभारलेल्या होर्डिंगमुळे उघडकीस आला आहे. या ठिकाणी तीन होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर त्यामध्ये नियमानुसार एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. पण संबंधित व्यावसायिकाने सलग १०० फुटांचे होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजप नेते तुषार पाटील यांनी देखील तक्रार केली होती. यावर अतिरिक्त  आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परवाना निरीक्षकांना यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. पण त्यांनी खुलासा सादर केला नाही. होर्डिंग व्यावसायिकाला होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई केलेली असतानाही तेथे जाहिरात लावण्यात आली आहे. त्याकडेही परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला आहे. (Pune Municipal Corporation)

| या कारणांमुळे केले निलंबित

 होर्डिंगमध्ये एक फुटाचे अंतर न ठेवता १०० फूट लांबीचे एकच होर्डिंग उभारले. संभाजी पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभारले आहे. होर्डिंग उभारताना वृक्षतोड करण्यात आली, पण त्याच्या परवानगीबाबत स्पष्टता नाही. जागा नदीपात्रात असूनही पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय नाहीजागेचा मोजणी नकाशा नाही. पोलीस  विभागाचा अभिप्राय नाही. जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही याची खात्री नाही. (PMC Pune)
—–
News Title | PMC Sky Sign Department | Suspension of license inspectors Rajendra Kevate, Surendra Raut, Laxmikant Shinde Information of Deputy Commissioner Madhav Jagtap