PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा आता 1 लाख 60 हजार | नवीन 5 सेंटर तयार केले जाणार
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (PMC Pune )शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेत (Urban poor medical support scheme) आता महापालिका प्रशासनाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रशासनाने ऑनलाईन (Online) सुविधा तयार करत बोगस लाभार्थ्यांना लगाम घातला होता. या योजनेत आता पर्यंत 1 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा (Income Limit) असलेल्या कुटूंबानाच सभासद होता येत होते. मात्र, ही उत्पन्न मर्यादा आता 1 लाख 60 हजार रूपये केली जाणार आहे. राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Health scheme) धर्तीवर ही उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान आता आधी महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तो नाही मिळाला तरच शहरी गरिबचा लाभ दिला जाईल. तसेच शहरात परिमंडळ स्तरावर नवीन 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. (PMC Shahari Garib Yojana)
| पुणे महापालिकेची शहरी गरीब योजना काय आहे? (what is PMC Punes Urban poor medical support scheme)
महापालिकेने 2008-09 पासून ही योजना सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे आहे. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation)
नवीन 5 सेंटर तयार केले जाणार
शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेकडून महापालिका भवनात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही लोकांना महापालिका भवनात येण्यासाठी कसरत करावी लागते. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी महापालिकेकेला शहरात सर्व ठिकाणी सेंटर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 5 परिमंडळ स्तरावर 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. यासाठी प्रति वर्ष 24 लाखाचा खर्च केला जाणार आहे. (PMC Pune News)