PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

HomeपुणेBreaking News

PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

कारभारी वृत्तसेवा Nov 02, 2023 1:59 PM

PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती 
MLA Hemant Rasane | पुणे शहरात वाढत असलेल्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका

PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

PMc Health Department | पुणे | महापालिका आरोग्य विभागाकडील (PMC Pune Health Department) उप आरोग्य आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल करण्यात आला आहे. याबाबत सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमुखाकडे (PMC Health Chief) मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य प्रमुखांनी कामकाजात बदल करण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला होता. याला मान्यता देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

डॉ. कल्पना बळीवंत, उप आरोग्य अधिकारी : यांच्याकडे प्र. आरोग्य अधिकारी, जन्म मृत्तू नोंदणी विभाग, स्मशानभूमी दफनभूमी अध्यावतीकरण याची जबाबदारी होती. ती बदलत आता त्यांच्याकडे आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन व क्षेत्रीय स्तरावरील

आस्थापना (मेडिकल युनिट),  पी. सी. पी.एन. डी.टी.,एम.पी.टी., १ ते ३ लाखांपर्यंतचे वैद्यकीय देयके
मान्य करण्याचे अधिकार आणि अर्बन ९५ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे राष्ट्रीय नागरी आरोग्य. अभियान, आर.सी.एच. (अंधत्व निवारण, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्य), आरोग्यवर्धिनी कार्यक्रम याची जबाबदारी होती. ती बदलत आता त्यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, साथरोग नियंत्रण, कोविड सानुग्रह अनुदान आणि PMGKY प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
३) डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे सेन्ट्रल मेडिकल स्टोर (औषध भांडार), मनपा रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकी करण या विभागांची जबाबदारी होती. त्यांच्याकडे देण्यात आलेल्या नवीन जबाबदारीमध्ये सेन्ट्रल मेडिकल स्टोर (औषध भांडार ), मनपा रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण, जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाची कामे. ( डी. पी. डी.सी.), मा. महापौर योजना व  सी.एस.आर.(सामाजिक दायित्व योजना) यांचा समावेश आहे. 
डॉ. सुर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, पी.सी.पी.एन.डी.टी.. एम.पी.टी., बोगस डॉक्टर शोध मोहीम,  एड्स नियंत्रण अधिकारी, साथ रोग नियंत्रण याची जबाबदारी होती. ती बदलून त्यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, बोगस डॉक्टर शोध मोहीम आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे राष्ट्रीय लसीकरणाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे जन्म मृत्यु नोंदणी विभाग व  स्मशानभूमी दफनभूमी अध्यावतीकरण ची जबाबदारी असणार आहे.
६) डॉ. मनीषा नाईक, यांच्याकडील कामात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
——