PMC Security Department | शिक्षण विभागातील ४८५ सुरक्षा रखवालदारांचे सुरक्षा विभागात होणार समायोजन | तत्काळ केल्या जाणार बदल्या
| अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश
PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे ४८५ सुरक्षा रखवालदार यांचे समायोजन महापालिका सुरक्षा विभागात केले जाणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या देखील केल्या जाणार आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
राज्य सरकारने राज्यातील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त केली आहेत. त्यातील कर्मचारी आणि अधिकारी हे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये वर्ग करण्याचे आदेश सरकार ने दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेत देखील स्वतंत्र शिक्षण विभाग अस्तित्वात आला. कर्मचारी देखील वर्ग करण्यात आले. दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील विविध शाळांमध्ये काम करणारे सुरक्षा रखवालदार हे शिक्षण विभागाच्या अखत्यारीत होते. त्यांचे समायोजन आता सुरक्षा विभागात केले जाणार आहे. (Pavneet Kaur IAS)
हे समायोजन करणे आणि तेथील दस्तऐवज हस्तांतरित करण्यासाठी सुरक्षा विभाग आणि शिक्षण विभागातील १४ कर्मचारी आणि अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रखवालदार यांचे वेतन, पगारबिल, नियतकालिक बदली, सेवा पुस्तके अशा सर्व गोष्टीचे हस्तांतरण करायचे आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोन महिन्याचा कालावधी दिला आहे.
—-
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे. हे झाल्यानंतर तत्काळ या कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या देखील केल्या जातील.
– राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी.

COMMENTS