PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय

HomeBreaking Newsपुणे

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय

कारभारी वृत्तसेवा Dec 15, 2023 3:11 AM

JICA | मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वर्षाला 4 कोटीची वीज निर्माण होणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रकल्पाला भेट
Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन 
Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय

PMC Sanas Ground | पुणे | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) नुकतेच करोडो रुपये खर्चून सणस मैदान (Baburao Sanas Ground) विकसित केले आहे. अॅथलेटिक्स खेळाडूसाठी पुणे शहराच्या केंद्रस्थानी पहिला व एकमेव असा ४०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक (Synthetic Track) तयार केला होता. मात्र महापालिकेला हे मैदान स्वतःच्या जबाबदारीवर चालवणे शक्य होईना झाले आहे. त्यामुळे हे मैदान पहिल्यांदाच भाडे तत्वावर देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आता महापालिकेला महिन्याला साडे पंधरा हजार भाडे मिळणार आहे. (PMC Pune News)

याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनांकडून शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने सन २००६ मध्ये सारसबागेच्या शेजारील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेवर मैदान विकसित केले व या ठिकाणी ७ एकर जागेमध्ये अॅथलेटिक्स खेळाडूसाठी पुणे शहराच्या केंद्रस्थानी पहिला व एकमेव असा ४०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार केला होता. तसेच या मैदानावर लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन ठिकाणी स्वतंत्र पिट आणि भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज इ. साठी देखील मैदान तयार करणेत आलेले होते. (Pune Municipal Corporation)

मे २०२३ अखेर कै. बाबुराव सणस मैदान येथील खेळाच्या मैदानावर ४०० मी. ८ लेन सिंथेटिक ट्रॅकचे नुतनीकरण करण्याचे काम भवन विभागाकडून करण्यात आलेले आहे. तसेच ट्रॅकच्या आतील भागात असलेल्या
मैदानावर लॉन बसविण्यात आली असून लांबउडी, तिहेरी उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज इ. क्रीडा प्रकारासाठी प्लॉट तयार करण्यात आले आहे. सदर सिंथेटिक ट्रॅक व मैदानाचे उद्घाटन २७/०५/२०२३ रोजी करण्यात आले असून सिंथेटिक ट्रॅक व मैदान खेळाडूंच्या वापरासाठी विनियोजन करणेकरिता क्रीडा विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर मैदान क्रीडा विभागाच्या अखत्यारीत असून निर्मिती पासून क्रीडा विभागाकडून चालविण्यात येत असल्याने याबाबत क्रीडा धोरण २०१३ च्या नियमावलीप्रमाणे मैदानाचा व सिंथेटिक ट्रॅकचा वापर होत आहे. परंतु नियमावलीतील अस्पष्टता तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे सदर मैदानाचे व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरत होते. सध्यस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक व अॅथलेटिक्स खेळासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा यांचा सुनियोजित वापर होण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील अनुभवी व नामांकित क्रीडा संस्था तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडू यांना सदर सिंथेटिक ट्रॅक व मैदान चालविणेस देणे योग्य होईल. त्याचा अॅथलेटिक्स खेळाडूंना फायदा होऊन ट्रॅक व मैदानाचे सुयोग्य पद्धतीने वापर व देखभाल होणे शक्य होणार आहे.
त्याअनुषंगाने कै. बाबुराव सणस मैदान व सिंथेटिक ट्रॅक हे अॅथलेटिक्स खेळाच्या प्रशिक्षणासाठी Quality Cum Cost BasicSelection या पद्धतीनुसार ३ वर्षे कालावधीसाठी मनपा निर्धारित केलेल्या मुल्यांकनानुसार मासिक भाडे १०,०००/- (वार्षिक भाडे १,२०,०००/- ) याप्रमाणे विनियोगासाठी देणेकरिता निविदा प्रक्रिया राबविणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली होती. त्यानुसार टेंडर प्रक्रिया करण्यात आली. Inventure academy of sports and research foundation ने 5555 रुपये ने अधिक दर दिला होता. त्यामुळे त्यांची निविदा मान्य करण्यात आली. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूरीसाठी शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.