PMC Safai Kamgar | सफाई कामगारांना दीड पट वेतन देण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे परिपत्रक जारी

Homeadministrative

PMC Safai Kamgar | सफाई कामगारांना दीड पट वेतन देण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे परिपत्रक जारी

Ganesh Kumar Mule Jan 19, 2026 8:14 PM

Chitale Bandhu Mithaiwale | सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी उद्योगाची सूत्रे  | संजय चितळे
Pune Breaking News | केंद्र सरकार कडून पुणे महापालिकेला १२९० कोटी निधी मंजूर
Mhila Aayog Aypa Dari | महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

PMC Safai Kamgar | सफाई कामगारांना दीड पट वेतन देण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे परिपत्रक जारी

 

Pavneet Kaur IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्य सणांच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांकडून काम करून घेतल्यास त्यांना आर्थिक मोबदला म्हणून त्या दिवसाचे दीडपट वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुसार यावर अंमल करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी परिपत्रक जारी केले आहे. (PMC Labour Welfare Department)

महापालिका प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेने विभागनिहाय सुट्ट्यांची संख्या निश्चित करून धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार पुणे मनपातील प्रशासकीय अधिकारी/कर्मचा-यांशिवाय अन्य कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्या जातात.

दरम्यान राज्य सफाई कर्मचारी आयोग यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये “शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांना किती वार्षिक सुट्ट्या दिल्या जातात, सफाई कर्मचान्यांना सर्व मान्य शासकीय सुट्ट्या देण्यात याव्या व दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात यावी, ती सुट्टी दिली जात नसेल तर त्याचे अतिरिक्त वेतन देण्यात यावे.” असे निर्देश अध्यक्ष यांनी दिले होते.

दरम्यान ज्या विभागांना ५ दिवसाचा आठवडा लागू होणार नाही त्या विभागांची माहिती शासन निर्णयात नमूद केली आहे. यामध्ये “सफाई कामगार” यांचाही समावेश आहे. त्यामुळे शासन निर्देश विचारात घेता सफाई कामगारांना ५ दिवसांच्या आठवड्याप्रमाणे शनिवारची सुट्टी लागू करता येत नाही.

पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांकडून सुट्टीच्या दिवशी काम करून घेतल्यास त्याचा आर्थिक मोबदला म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांला दिवसाचे दिडपट वेतन द्यावयाचे झाल्यास यासाठी वेतन खर्चामध्ये वार्षिक ३.५ ते ४ कोटी वाढ होणार असल्याने त्यासाठी मुख्य सभेचे मंजुरीने धोरण ठरवावे लागणार आहे. त्यानुसार कामगार कल्याण विभागाने हा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवला होता.

त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना दरवर्षी शासनाकडून अधिसूचित केल्या जाणाऱ्या शासकीय सुट्ट्यांपैकी सफाई कामगारांना पुर्वीपासून दिल्या जाणाऱ्या १२ दिवस सुट्ट्या वगळून इतर मान्य सणांच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांकडून काम करून घेतल्यास त्यांना आर्थिक मोबदला म्हणून सदर दिवसाचे दीडपट वेतन देण्याला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. २०२६  मध्ये या शासकीय सुट्ट्या २४ इतक्या आहेत. त्यामुळे कामगारांना १२ सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.

दीड पट वेतनाच्या अंमल बाबत अतिरिक्त आयुक्त खालील प्रमाणे आदेश दिले आहेत

१) दिडपट वेतनाची गणना पुढील प्रमाणे करावी.
मूळवेतन + महागाई भत्ता = एकूण वेतन + ३०= एक दिवसाचे वेतन x १.५ = त्या दिवसाचे दिडपट वेतन (उदाहरनार्थ:- १८,००० + १२,००० = ३०,००० + ३० = १,००० x १.५ = १५०० त्या दिवसाचे वेतन मिळेल.)
२) ज्या सणांच्या सुट्टीच्या दिवशी त्यांनी अर्धा वेळ काम केले असेल त्या अर्ध्या वेळेचे वेतन दिडपट दराने द्यावयाचे आहे. (उदा:- ९,०००+ ६,००० = १५,००० + ३० = ५०० x १.५ = ७५०)
३) तसेच शासनाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांनंतर पुन्हा भविष्यात काही सुट्ट्या शासनाकडून जाहीर झाल्यास त्या दिवसाचे देखील वेतन दिडपट दराने अदा करावे.
४) सणांची सुट्टी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्यास त्याचे दिडपट वेतन अदा केले जाणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: