PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण
| पथ विभागाचा उपक्रम
PMC Road Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडे (PMC Road Department) नुकत्याच झालेल्या अभियंत्याच्या बदलीच्या (PMC Engineers) पार्श्वभूमीवर पथ विभागाकडील व क्षेत्रिय कार्यालयाकडील अभियंत्यांना आज सकाळी 11 वाजता प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणासाठी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC), अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे (Sahebrao Dandge PMC), अमर शिंदे (Amar Shinde PMC) व सर्व कार्यकारी अभियंता तसेच मुख्य खात्याकडील व वॉर्ड ऑफिस कडील सर्व उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. (Pune PMC News)
सर्व अभियंत्यांना मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, अमर शिंदे, निखिल मिजार, विकास ठकार यांनी रस्त्याचे कामकाजाबाबत तांत्रिक व प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाचा फायदा असा कि, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्त्याच्या कामात सुधारणा व खड्डे दुरुस्तीचे कामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. अन्य खात्यातून बदली झालेल्या अभियंत्यांना याचा खूपच फायदा होणार आहे. अशा प्रकारचे पथ विभागाकडून प्रशिक्षण वारंवार देण्यात येत असून यापुढील काळातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती पथ विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
COMMENTS