PMC Road Department | शहरात मानकांप्रमाणे असणारे गतिरोधक किती याची माहिती सर्व्हे नंतरही गुलदस्त्यात  | विवेक वेलणकर यांचा महापालिका पथ विभागावर निशाना 

HomeपुणेBreaking News

PMC Road Department | शहरात मानकांप्रमाणे असणारे गतिरोधक किती याची माहिती सर्व्हे नंतरही गुलदस्त्यात | विवेक वेलणकर यांचा महापालिका पथ विभागावर निशाना 

गणेश मुळे Mar 11, 2024 1:35 PM

PMC Budget 2025-26 | एका भागात केंद्रित विकास करण्याऐवजी शहराच्या सर्व भागांत संतुलित विकास करण्याचे अंदाजपत्रक मुख्य सभेत मंजूर करा | माजी नगरसेवकांनी दिला नगर विकास विभागाकडे जाण्याचा इशारा 
PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 
Pune PMC Helmet News | कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना देखील हेल्मेट सक्तीचे केल्याने पुणे महापालिकेत उद्भवले वादाचे प्रसंग!

PMC Road Department | शहरात मानकांप्रमाणे असणारे गतिरोधक किती याची माहिती सर्व्हे नंतरही गुलदस्त्यात

| विवेक वेलणकर यांचा महापालिका पथ विभागावर निशाना

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – महिन्याभरापूर्वी महापालिकेच्या अभियंत्यांनी (PMC Engineers) पायी फिरुन शहरातील स्पीड ब्रेकर्स (Pune Speed Breakers) चा सर्व्हे केला. यातील किती स्पीड ब्रेकर्स शास्त्रीय मानकांप्रमाणे सापडले व त्यांचे लोकेशन याची माहिती मी गेले तीन सोमवार माहिती अधिकार दिनात मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासहित कोणीच ती माहिती देऊ शकत नाही. असा टोला सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी महापालिका पथ विभागाला लगावला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

वेलणकर यांनी सांगितले कि, खरं तर सर्व्हे करताना हे जागेवर नोंद करणे आवश्यक होते.  मग सर्व्हे नक्की कसला झाला असा प्रश्न माझ्यासारख्या अज्ञ माणसाला पडतोय. मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवा आणि प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये मिळवा असे खुले आव्हान मी एक महिन्यापूर्वी दिले होते.  त्याप्रमाणे मी गेले तीन सोमवार पाच हजार रुपये घेऊन महापालिकेच्या पथ विभागात जात आहे.  मात्र सर्व्हे नंतर महिनाभराने सुद्धा महापालिका पथ विभाग मानकांप्रमाणे नक्की किती स्पीड ब्रेकर आहेत व त्यांचे लोकेशन याची माहिती देऊ शकत नाही. याचाच अर्थ एकही स्पीड ब्रेकर मानकांप्रमाणे नाही या माझ्या दाव्याला पुष्टी मिळते आहे.  असे विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.