PMC Retired Employees | बोनाला, महाडदळकर यांच्यासह पुणे महापालिकेचे 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

HomeपुणेBreaking News

PMC Retired Employees | बोनाला, महाडदळकर यांच्यासह पुणे महापालिकेचे 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

गणेश मुळे Aug 02, 2024 3:28 PM

PMC Kamgar Dindi | पुणे महानगरपालिकेच्या कामगार दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश!
International RTI Day | भारतात सर्वप्रथम माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करणाऱ्या डॉ. शाहिद रजा बर्नी यांचा पुणे महापालिकेने केला सन्मान! 
PMC Retirement | ऑगस्ट महिन्यात पुणे महापालिकेचे 62 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

PMC Retired Employees | बोनाला, महाडदळकर यांच्यासह पुणे महापालिकेचे 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – जुलै, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. ( Pune Municipal Corporation – PMC)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कलाकार माननीय बंडा जोशी व आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक मा. संजय भुजबळ,  मुख्य अभियंता (प्रकल्प)  श्रीनिवास बोनाला , उप आयुक्त (वि.)  आशिष महाडदळकर हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली तसेच कुणाला पेन्शन किंवा देय रकमा देण्यात काही अडचण असल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे नमूद करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

सुरेश परदेशी, वरिष्ठ लघुलेखक यांनी त्यांचे सेवानिवृत्तीच्या मनोगतामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये पुणे महानगरपालिका या संस्थेने आम्हाला सर्व काही दिले आहे त्याबद्दल आपले ऋण व्यक्त केले व सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सेवनिवृत्तीच्या मनोगतामध्ये आशिष महाडदळकर यांनी आज मनपा सेवेतून सेवानिवृत्त होताना सर्व सहकारी व मित्रपरिवार यांना सोडून जात असताना खूप दुःखही होत आहे तसेच आपण केलेली सेवा आज संपुष्टात येत असल्याने कुटुंबास वेळ देता येईल म्हणून आनंदही होत आहे. अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय भुजबळ यांनी सर्वानी स्वतःचे आरोग्य सांभाळावे, काही इच्छा असल्यास त्या त्यांनी पूर्ण कराव्यात असे नमूद करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जेष्ठ हास्य कलाकार मा. श्री बंडा जोशी यांनी त्यांचे विनोदी शैली मध्ये सर्व उपस्थितांना खूप हसविले. तसेच व्यक्ती जेव्हा खळखळून हसतो तेव्हा तो सर्वात सुंदर दिसतो असे नमूद करून सर्वांनी कायम हसत रहा हसल्याने माणसाचे सर्व रोग दूर होतात व माणूस कायम तरुण राहतो असे नमूद करून सर्वांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी व अलका जोशी यांनी केले.