PMC Pune RFD project | एनजीटीचे पुणे महापालिकेला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत 31 जुलै पर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune RFD project | एनजीटीचे पुणे महापालिकेला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत 31 जुलै पर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश 

Ganesh Kumar Mule May 31, 2023 2:55 PM

SRA | PMC Pune | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी | एसआरए आणि पुणे महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय
PMC Employees Transfer | पुणे महापालिका कर्मचाऱ्याची मंत्रालयात बदली! | राज्य सरकार अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप
Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

PMC Pune RFD project | एनजीटीचे पुणे महापालिकेला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत 31 जुलै पर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश

PMC Pune RFD project | पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत (River front Devlopment project) 31 जुलै म्हणजे पुढील सुनावणी पर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश एनजीटीने (NGT) दिले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेने (PMC Pune) युक्तिवाद करताना परवानगी शिवाय झाडे तोडत असल्याच्या अर्जाचे खंडन केले. (PMC Pune RFD Project)
  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (national Green Tribunal) सारंग यादवाडकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज NGT ने  पुणे महापालिकेवर (PMC Pune) वर जोरदार टीका केली.  “आरएफडी प्रकल्पासाठी (RFD project) एकही झाड तोडले जाणार नाही, असे स्पष्टपणे डीपीआरमध्ये नमूद केले असेल तर. आणि “पर्यावरण मंजुरीमध्येही असे म्हटले आहे की एकही झाड तोडायचे नाही, तर तुम्ही झाडे का तोडत आहात?” असा सवाल NGT ने पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation PMC) ला केला. सर्व परवानग्या मिळेपर्यंत पीएमसीने आरएफडी प्रकल्पासाठी एकही झाड तोडू नये, असे एनजीटीने पुढे निर्देश दिले. (Pune Municipal Corporation RFD project)
 गेल्या अनेक आठवड्यांपासून पीएमसी असंख्य झाडे तोडून नष्ट करत आहे.  29.4.23 रोजी झालेल्या चिपको आंदोलनात (Pune Chipko Andolan) सहभागी होऊन हजारो पुणेकरांनी पीएमसीच्या या विध्वंसक कृत्याविरोधात आवाज उठवला आहे. (PMC Pune Marathi News)

पुणे महापालिकेने असा केला खुलासा

१८/०५/२०२३ रोजी मे. राष्ट्रीय हरित लवाद येथेदाखल करण्यात आलेल्या Original Application No. ८०/ २०२३, ‘सारंग यादवडकर व इतर वि. पुणे महानगरपालिका व इतर’ अन्वये दि. ३१/०५/२०२३ राष्ट्रीय हरित लवाद, पुणे येथे मा.न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंघ व डॉ. विजय कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सदर अर्जान्वये अर्जदार यांनी पुणे महानगरपालिका परवानगीशिवाय वृक्षतोड करण्याच्या तयारीत असल्याबाबत अर्ज केला आहे. महानगरपालिकेकडून सदर अर्जाचे खंडन करण्यात आले आहे. महापालिकेकडून स्पष्टोक्ती देताना, महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्षतोडीसाठी परवानगी अर्ज केला आहे व सदर परवानगी मिळेपर्यंत वृक्षतोड करण्याचे प्रयोजन नाही. अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. तथापि पुणे महानगरपालिकेस सदर अर्जावर योग्य स्पष्टता देता-यावी या अनुषंगाने २ आठवड्यचा कालावधी देण्यात यावा अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली. सबब दि. ३१/०७/२०२३ रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या युक्तिवादास अनुसरून पुढील सुनावणीपर्यंत पुणे महानगरपालिकेस वृक्षतोड न करण्याचे आदेश लवादाकडून देण्यात आलेले आहेत. (River front Devlopment Pune)
—-
News title | PMC Pune RFD project | NGT directs Pune Municipal Corporation not to cut a single tree till July 31 under River Front Development Project