PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाणून घ्या!

HomeपुणेPMC

PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाणून घ्या!

Ganesh Kumar Mule Sep 25, 2022 3:35 AM

BARTI | अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण
BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर
Manjusha Nagpure | सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा  | माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाणून घ्या!

| लिपिक पदाच्या परीक्षा 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होणार!

पुणे | पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. आता परीक्षा घेणे बाकी आहे. iBPS संस्था यासाठी परीक्षा घेणार आहे. महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा सोडून सर्व पदाच्या परीक्षेच्या तारखा अंतिम करण्यात आल्या आहेत. तर लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदासाठी जास्त उमेदवार असल्याने जास्त दिवस परीक्षा चालणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्या माहितीनुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात येणार आहे. ही तारीख अंतिम आहे. याचे जाहीर प्रकटन देखील देण्यात आले आहे. शिवाय याची माहिती उमेदवारांना देखील देण्यात आली आहे.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला तर 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. याचे देखील जाहीर प्रकटन देऊन उमेदवारांना माहिती देण्यात आली आहे.

कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदासाठी जास्त उमेदवार असल्याने जास्त दिवस परीक्षा चालणार आहे.

याची माहिती उमेदवारांना 7 दिवस अगोदर दिली जाईल. उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. याची सर्व माहिती प्रशासनाकडून उमेदवारांना इ मेल आणि मेसेज च्या माध्यमातून दिली जाणार आहे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत.

महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.