PMC Property tax Department | २ DI आणि ४३ SI यांचे वेतन थांबवले | मिळकतकर विभाग प्रमुखांची कारवाई!
Pune Property tax – (The Karbhari News Service)
– मिळकतकर नोंदीच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या २ SI आणि ४३ SI यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. तसेच कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांच्याकडून खुलासा देखील मागवण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation property tax Department)याबाबत माधव जगताप यांनी सांगितले कि वाघोली, नऱ्हे आणि मांजरी या समाविष्ट गावातील मिळकतकराचे काम करणारे हे कर्मचारी आहेत. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली असून देखील इथल्या जवळपास १८ हजाराहून अधिक मिळकतींची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट होऊन देखील या गावांतून महापालिकेला मिळकतकर मिळाला नाही. या मिळकतीच्या ८ ड च्या नोंदीच कित्येक दिवसापासून करण्यात आलेल्या नाहीत. यात महापालिकेचे नुकसान झाले आहे. या आधी देखील कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. तरीही कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे वेतन थांबवण्याची कारवाई करण्यात आली आहे. असे जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी सांगितले कि, नोंदी करण्याचे काम याच कर्मचाऱ्यांकडे देण्यात आले आहे. तसेच गावातील लोकाकडून आम्ही कर वसूल करणार आहोत. मात्र एकदम जास्त बिल दिसल्याने नागरिक गोंधळून जाऊ शकतात. मात्र नागरिकांना कर हा भरावाच लागणार आहे.
COMMENTS