PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडील एकवट वेतनावरील अभियंत्यांच्या वेतनासाठी 75 लाख देण्यास स्थायीची मंजूरी
| मे महिन्यापासून प्रलंबित होते वेतन
| माहिती व तंत्रज्ञान विभागाची उदासीनता कारणीभूत
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) विविध आर्थिक स्त्रोतांपैकी मालमत्ता कर (Pune Property tax) हा स्त्रोत अत्यंत महत्वाचा आहे. करआकारणी व करसंकलन विभागाकडील मिळकतकर संगणक प्रणालीची विविध स्तरावर आवश्यकते प्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर विविध विभागाशी इंट्रीग्रेशन करणे, संगणक प्रणालीची देखभाल दुरुस्तीचे कामे विहित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करणे, इ. विविध कामे एकवट वेतनावरील सेवकांकडून केली जातात.
पुणे शहराच्या कार्यकक्षेत आकारणी झालेल्या व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांकडील मिळकतधारकांना विविध प्रकारच्या योजना, देयके, नोटीस, शास्ती, जमा व थकबाकी, जीआयएस इ. विविध प्रकारची कामे केली जातात. करआकारणी व करसंकलन विभागाकडे तांत्रिक ज्ञान असलेले सेवक उपलब्ध नाही. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे वेळोवेळी शेडयूलमान्य सेवकांची मागणी करण्यात आलेली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे प्रोग्रामर तसेच डेटावेस संबंधित विशेष तांत्रिक पात्रता धारण करणा-या सेवकांची शेडयूलमान्य पदे रिक्त व काही पदे आकृती बंधात नाहीत. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे प्रोग्रामर तसेच डेटाबेस संबंधित वरील प्रमाणे विशेष पात्रता धारण करणारी शेडयूलमान्य पदे नाहीत. तसेच करआकारणी व करसंकलन विभागाकडील उत्पन्नवाढीच्या दृष्टीने व कामकाज गतिमान होणाच्या दृष्टीने संगणकीय दृष्टया कामकाज गतीमान होण्याच्या दृष्टीने कामकाजात व सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाचे संगणकीय कामकाज करण्यासाठी ६ महिने एकवट वेतनावर संगणक कामकाज करणेबाबत संगणक अभियंते यांना घेण्यात येते. मात्र या लोकांची ०१.०५.२०२३ रोजी सहा महिने मुदत कालावधी समाप्त झाला. दरम्यानच्या कालावधीत पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मिळकतीना ४०% सवलत देणेबाबत अमल करणे, मिळकतधारकांची देयके ऑनलाईन योग्य अचूकरित्या बनवणे, अशी कामे १५.०५.२०२३ पासून कार्यरत ०९ संगणक अभियंते यांनी त्यांच्या अनुभवाच्या व कौशल्याच्या जोरावर दिवसरात्र काम करून आयुक्त यांनी निर्धारित केलेल्या मुदतीत सन २०२३-२४ चे देयकांचे कामकाज केले आहे. मिळकतधारकांना विविध माध्यमांनी (ऑनलाईन, रोख, धनादेश इ.) मिळकतकर भरणा करता यावा व खात्याकडील संगणक प्रणाली सुरळीत सुरु ठेवणेकरिता एकवट वेतनावरील संगणक अभियंते यांचा मोलाचा व महत्वाचा वाटा आहे, ही वस्तुस्थिती आहे. सद्य कार्यरत एकवट वेतनावरील संगणक अभियंते यांचा कार्यकाळ दि. ०१.०५.२०२३ रोजी समाप्त झाला असल्याने सदर ९ संगणक अभियंते हे आज अखेर काम करत आहेत असे असताना देखील त्यांना माहे मे महिन्यापासून अद्यापपर्यंत त्यांना वेतन आदा करण्यात आलेले नाही. (PMC Pune News)