PMC Property Tax Department | मिळकत करामध्ये ५% ते १०% सवलतीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवणार! | मिळकत कर विभागाकडून हालचाली 

Homeadministrative

PMC Property Tax Department | मिळकत करामध्ये ५% ते १०% सवलतीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवणार! | मिळकत कर विभागाकडून हालचाली 

Ganesh Kumar Mule Jun 26, 2025 8:03 PM

Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त
PMC Water Supply Department | नागरिकांच्या टॅक्सच्या रकमेतून वाढीव बिलाची रक्कम देणे अन्यायकारक | पुणे महापालिकेचे या विभागाला खरमरीत पत्र!
Naval Kishor Ram IAS | शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर  | विभाग प्रमुख आणि उपायुक्त देखील होते उपस्थित 

Avinash Sapkal PMC Property Tax Department | मिळकत करामध्ये ५% ते १०% सवलतीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवणार! | मिळकत कर विभागाकडून हालचाली

 

Pune Property Tax – (The Karbhri News Service) – पुणेकर नागरिकांना आर्थिक वर्षाच्या  पहिल्या दोन महिन्यात मिळकत कर भरला तर ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. तो कालावधी ३० जून पर्यंत देण्यात आला आहे. मात्र नागरिकांची, स्वयंसेवी संस्थांची आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी पाहता हा कालावधी अजून १५ दिवस म्हणजे १५ जुलै पर्यंत वाढवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation Property Tax Department)

 

पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन केलेले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४,४३,००० इतकी असून, सन २०२५ २०२६ आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची मागणी रक्कम  २५०० कोटी इतकी आहे. ०१/०४/२०२५ ते दिनांक २६/०६/२०२५ अखेर ६,१४,६३५ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. १०१३.२५ कोटी इतका मिळकत कर वसूल केला आहे. अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दिली.

३०/०६/२०२५ अखेर मिळकत करामध्ये ५% ते १०% इतकी सवलत मिळणार असल्यामुळे, मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात आलेआहे.

 

online payment करण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-

NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon Pay, NEFT-RTGS, etc.

नागरी सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे.