PMC Primary Education Department | शिक्षण मंडळाच्या समायोजनाचा मार्ग मोकळा! | शिक्षण विभागाची सेवाज्येष्ठता यादी मनपा सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश

HomeपुणेBreaking News

PMC Primary Education Department | शिक्षण मंडळाच्या समायोजनाचा मार्ग मोकळा! | शिक्षण विभागाची सेवाज्येष्ठता यादी मनपा सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 18, 2023 12:42 AM

Ravindra Binwade IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची बदली!
PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा
PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार | अर्ज करण्यासाठी अजून मुदतवाढ

 PMC Primary Education Department | शिक्षण मंडळाच्या समायोजनाचा मार्ग मोकळा! | शिक्षण विभागाची सेवाज्येष्ठता यादी मनपा सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश

PMC Primary Education Department | गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित असलेला शिक्षण मंडळ समायोजनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तत्कालीन शिक्षण मंडळ म्हणजेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखनिकी संवर्गातील शिक्षकेतर सेवकांच्या सेवाज्येष्ठता याद्या पुणे महापालिका सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाच्या सेवकांच्या पदोन्नतीचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. (Pune Municipal Corporation)

शासनाने ०८/०७/२०२१ रोजी प्राथमिक शिक्षण विभागाचा स्वतंत्र आकृतिबंध मंजूर केलेला असून सद्यस्थितीत शिक्षकेतर ९८९ पदे मंजूर केलेली असून त्यापैकी ४८५ कायम पदे आणि रोजंदारीवरील शिपाई एकूण ९४ व रखवालदार एकूण २६५ असे एकूण ३५९ सेवक कार्यरत आहेत. त्यानुसार शिक्षण विभाग समायोजनाला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune Employees)

सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करायची आहे

१) प्राथमिक शिक्षण विभागाकडील तत्कालीन शिक्षण मंडळातर्गत नियमानुसार विहित पद्धतीने नियुक्त झालेल्या सेवकांची सेवाजेष्ठाता, इतर सेवालाभ व निवृत्ती वेतन इवे लाभ अनुषंगिक लाभ यापूर्वी तत्कालीन शिक्षण मंडळ सेवेत विहित पद्धतीने कायम केलेल्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (सिव्हील) (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग-३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) या पदावरील आकृतीबंधनुसार मान्य शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे मनपाच्या आस्थापनेवरील सेवकांमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये समावेशन करण्यात येत आहेत.
२) उपरोक्त नमूद हुद्याची पुणे मनपाकडील मंजूर पदे आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील मंजूर पदे, कार्यरत पदे एकत्रित करून एकच रोस्टर करावे आणि नियमित प्रक्रियेत सदर सेवकांच्या बदल्या मनपाच्या इतर खात्यामध्ये कराव्यात.
३) समावेशन केलेल्या पदाची अर्हता धारण केलेची खातरजमा करून उपरोक्त पदावरील कर्मचारी यांची सेवा पुणे मनपात संवर्गनिहाय सेवाज्येष्ठता यादीमध्ये समावेशन करावे.
४) समावेशन झालेल्या सेवकांची सेवाजेष्ठाता इतर सेवालाभ व निवृत्ती वेतन इ.चे लाभ अनुषंगिक लाभ यापूर्वी तत्कालीन शिक्षण मंडळ सेवेत विहित पद्धतीने कायम केलेल्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून देण्यात यावेत.
५) समायोजन करावयाच्या कर्मचाऱ्यांना ज्येष्ठता दिनांक निश्चित करणे, स्थान देणे, वेतनाबाबत व इतर काही अडचणी आल्यास आवश्यक निर्णय घेणे इ. कार्यवाही अति.महा.आयुक्त (ज) यांचे स्तरावर
करावी.