PMC | PMPML | संचलन तूट पोटी पीएमपी ला ३० कोटी देण्याचा प्रस्ताव!
| स्थायी समिती समोर प्रस्ताव
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पीएमपी ला (PMPML) संचलन तूट पोटी ३० कोटी ८० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) सन २०२३-२४ चे ताळेबंदानुसार संचलन तुट रक्कम रु.७०६.३५ कोटी असून पुणे महानगरपालिकेचा (६०%) स्वामित्व हिश्श्यानुसार ४२३.८१/- कोटी होत आहेत. त्यापैकी PMPML संस्थेस उचल स्वरुपात आदा केलेली सामायोजीत रक्कम व प्रतिमहा आदा करण्यात आलेली रक्कम असे एकूण रक्कम ३९२,४९,८९,७१७ इतकी रक्कम PMPML संस्थेस आदा करण्यात आलेली आहे. उर्वरित देय रक्कम ३१,३१,१०,२८३/- मधून मनपा मुद्रणालय विभागाची थकबाकी रक्कम र४९,४६,००० इतकी रक्कम समायोजित करून उर्वरित देय रक्कम ३०,८१,६४,२८३ दिली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सन २०२४- २५ अंदाजपत्रकात RE58A101A पीएमपीएमएलच्या संचलानमधील तुटीपोटीचा हिस्सा या अर्थशीर्षकांतर्गत करण्यात आलेल्या तरतूदीमधून पुणे महानगरपालिकेकडून PMPML ला अदा केली जाणार आहे.
COMMENTS