PMC Pension | पेन्शन प्रकरणाची प्रभारी नगरसचिवांकडून गंभीर दखल| | संबंधित बिल क्लार्कला २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश

PMC Building

Homeadministrative

PMC Pension | पेन्शन प्रकरणाची प्रभारी नगरसचिवांकडून गंभीर दखल| | संबंधित बिल क्लार्कला २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Aug 28, 2024 8:21 PM

PMC Chawl Department | पुणे महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये निवासस्थान (घर) मिळण्यासाठी इच्छुक महापालिका कर्मचारी करू शकतात अर्ज
Durability Certificate | महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिले जाणार स्थायित्व प्रमाणपत्र | कालबद्ध पदोन्नती आणि इतर गोष्टीसाठी होणार फायदा
The Karbhari Impact | PMC Employees | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना मानधन मिळणे सुरु!

PMC Pension | पेन्शन प्रकरणाची प्रभारी नगरसचिवांकडून गंभीर दखल| | संबंधित बिल क्लार्कला २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश

 

PMC Municipal Secretary office – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation- PMC) नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होऊन ४ महिने होऊन गेले तरी पेन्शन सुरू झाली नाही. त्यामुळे आजारी असतानाही पेन्शन नाही आणि वैद्यकीय योजनेचा लाभ नाही, अशा कात्रीत संबंधित सेवक सापडला. याची गंभीर दखल प्रभारी नगरसचिव योगिता भोसले (Yogita Bhosale PMC) यांनी घेतली आहे. या हलगर्जीपणाला बिल क्लार्क जबाबदार आहे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. बिल क्लार्क ला कारणे दाखवा नोटीस देत २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती योगिता भोसले यांनी दिली. (Pune PMC News)

नगरसचिव विभागातील कर्मचारी तुळशीराम भोजने हे एप्रिल २०२४ सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांना हक्काच्या रजेचे पैसे अजून मिळाले नाहीत. तसेच पेन्शन देखील सुरू झाली नाही. त्यातच नुकताच त्यांना पैरालिसिस चा अटॅक आला. मात्र पेन्शन सुरू नसल्याने त्यांना तत्काळ अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळू शकला नाही. यात नगरसचिव विभागातील आणि आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत भोजने यांना जहांगीर हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून दिला. (Pune Municipal Secretary Office)

दरम्यान भोजने यांचे पेन्शन प्रकरण प्रलंबित ठेवण्याला बिल क्लार्क अजय शिवलेकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. याबाबत योगिता भोसले यांनी सांगितले कि, बिल क्लार्क ला कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. नोटीस मध्ये कामचुकारपणा केल्याबद्दल आपल्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच याबाबत उचित खुलासा करण्यासाठी शिवलेकर यांना २४ तासाची मुदत देण्यात आली आहे. असे भोसले यांनी सांगितले.

पॅनेलवरील हॉस्पिटलांचा मनमाना कारभार

दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अंशादायी सहायता वैद्यकीय योजना राबवली जाते. CHS कार्ड च्या आधारे कर्मचारी महापालिकेने नियुक्त केलेल्या आपल्या पॅनेलवरील हॉस्पिटलमधे कर्मचारी उपचार करू शकतात. मात्र ऐनवेळी हे हॉस्पिटल महापालिका कर्मचाऱ्याला दाखल करुन घेत नाहीत. भोजने यांच्या बाबतीत देखील तसेच झाले. उप आरोग्य अधिकाऱ्यांनी संपर्क करुन देखील त्यांना रूबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करुन घेण्यात आले नाही. त्यामुळे या हॉस्पिटलची मनमानी समोर आली आहे. महापालिका मात्र या हॉस्पिटलना वेळेवर बिले सादर करत असते.
—-

कामचुकारपणा केल्याबद्दल दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न बिल क्लार्कला विचारण्यात आला आहे. तसेच याबाबत उचित खुलासा करण्यासाठी बिल क्लार्कला २४ तासाची मुदत देण्यात आली आहे.

योगिता भोसले, प्रभारी नगरसचिव.