PMC on Stray Dogs | भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा पुणे महापालिकेचा  निर्णय!  |  असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली महापालिका! 

Homeadministrative

PMC on Stray Dogs | भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा पुणे महापालिकेचा  निर्णय!  |  असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली महापालिका! 

Ganesh Kumar Mule Oct 16, 2025 8:18 PM

Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 
PMC SDD | महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला उदयोजिकांचा औद्योगिक महोत्सव संपन्न!

PMC on Stray Dogs | भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा पुणे महापालिकेचा  निर्णय!  |  असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली महापालिका!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – केंद्र सरकारने देशाला २०३० पर्यंत रेबीजमुक्त शहर करण्याचे लक्ष्य ठेवले असून पुणे शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यास महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे. पुणे मनपा हद्दीतील भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला असून प्रायोगिक तत्त्वावर मनपा हद्दीतील भटके ६०० श्वानांना सुरुवातीला ‘मायक्रोचिप’ बसवण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका ही या प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Health Department)

पशुवैद्यकीय विभागाला एका खासगी कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत ६०० ‘मायक्रोचिप’ उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यापासून या ‘मायक्रोचिप’ बसवण्याचे काम सुरू होणार आहे. सदरच्या ‘मायक्रोचिप’ प्राणी प्रेमी यांच्या संपर्कात असलेल्या मात्र नसबंदी शाश्त्रक्रिया न झालेल्या श्वानांना नसबंदी शस्त्रक्रिया करताना मायक्रोचीप बसविण्यात येणार असून पुढील काही दिवस या श्वानांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करते आहे का, याची तपासणी करून हा उपक्रम शहरात राबवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सदर मायक्रोचिप तांदळाच्या दाण्याएवढ्या आकाराची आहे. सदर चीप GPR ‘मायक्रोचिप बसवण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन NOIDEOLUND स्कैनर मशीन यंत्राद्वारे या मायक्रोचिप स्कॅनिंग करण्यात येणार आहे. श्वानाचे वय, रंग, शस्त्रक्रियेची माहिती, कोणत्या परिसरातील आहे, पूर्वीच्या लसीकरणाची तसेच श्वान कुठल्या परिसरातील आहे, रेबीजचा संसर्ग झाला आहे का, नसबंदी झाली आहे का, याची माहिती आता ‘मायक्रोचिप’द्वारे मिळणार आहे. ‘मायक्रोचिप श्वानांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहेत. यामध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या दिल्ली, गोवा, जयपूर, बंगळूरु या ठिकाणी या प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच भटक्या श्वानांबाबत अनेकदा तक्रारी करण्यात असतात. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

या मायक्रोचिपला १५ अंकी युनिक नंबर असून या उपक्रमावाद्वारे मनपा हद्दीतील व नव्याने समाविष्ठ ३२ गावांमधील सर्व श्वांनाची माहिती आणि संख्या कळणार आहे. नसबंदी शखक्रिया करताना श्वानांना आधार कार्ड प्रमाणे नंबर मिळणार आहे. तसेच स्कॅनरच्या मदतीने श्वानांचा खांद्यावरील चीप स्कॅन करून त्या क्रमांकाच्या आधारे भटक्या श्वानांची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. मायक्रोचीप असलेल्या श्वानांचे चीप स्कॅन केल्यानंतर शस्त्रक्रिया व लसीकरण याची इत्यंभूत माहिती लगेच प्राप्त होऊन सदर श्वानास लसीकरण करणे अगर कसे? याबाबत नियोजन करता येईल व पुणे मनपा कडून सुरु असलेले भटक्या व मोकाट श्वानाचे नसबंदी शस्त्रक्रिया व अॅन्टी रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता येऊ शकेल.

पुणे मनपा हद्दीतील भटक्या श्वानांना मायक्रोचीप बसविण्याबाबत मा. महापालिका आयुक्त व अति. यांनी आदेश दिले असून रेबीज मुक्त पुणे महानगरपालिका करण्यासाठी आरोग्य अधिकारी व मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सल अॅनिमल बेफेअर सोसायटी या बाजगी संस्थेमार्फत चीप बसविण्यात येणार आहे. असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: