PMPML 7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरकापोटी पीएमपीला ८४ कोटी देण्यास मंजुरी!
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – सातवा वेतन आयोग फरकाचा पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना द्वित्तीय हप्ता अदा करण्यसाठी ८४ कोटी देण्याची मागणी पीएमपी प्रशासनाकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला आज समितीने मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचलनातून निर्माण होणारी आर्थिक तुट शासन निर्णयानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वतःच्या उत्पन्नातून भरून देत आहे. तसेच सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम देखील संचलन तुटीचाच भाग आहे.
दरम्यान पालकमंत्री यांचे समवेत २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीतअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, आयुक्त पुणे मनपा व आयुक्त पिंपरी-चिंचवड मनपा तसेच कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सातव्या आयोग फरक रकमेकरिता सविस्तर चर्चा होऊन सातवा वेतन आयोग फरक रक्कम 4 हफ्त्यात अदा करणेबाबत निर्णय झाला होता.
महामंडळाकडून सन २०२५ -२६ च्या अंदाजपत्रकात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सेवकांना सातवा वेतन आयोग फरक द्वितीय्य हप्ता अदा करणेकामी संचलन तुट तरतुदीबाबत पत्र देण्यात आले होते. तसेच अंदाजपत्रकात तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यास अनुसरून द्वितीय्य हप्ता अदा करणेकामी पुणे महानगरपालिका ६०% हिश्या नुसार ८४.१५ कोटी महामंडळास देण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

COMMENTS