PMC Officers Promotion | अखेर अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदी पदोन्नती!
| महापालिका आयुक्तांचे आदेश जारी
PMC Officers Promotion | पुणे | महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) अभियांत्रिकी संवर्गातील (PMC Engineering Cadre) काही अधिकाऱ्यांची पदोन्नती (PMC Officers Promotion) रखडली होती. सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन देऊन देखील पद स्थापनेबाबत आदेश दिले जात नव्हते. याबाबत The Karbhari ने देखील विषय लावून धरला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती दिली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
Also Read this News | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो
अभियांत्रिकी वर्गातील 6 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) हे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती साठी पात्र होते. त्यानुसार त्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती देण्यासाठी पदोन्नती समितीने शिफारस केली होती. तसेच शहर सुधारणा आणि मुख्य सभेने देखील मान्यता दिली होती. तरीही या अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि पद स्थापने बाबत आदेश दिले जात नव्हते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नव्हती. अखेर टीका सहन करावी लागल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Latest News)
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अमर शिंदे (Amar Shinde PMC) यांना त्यांच्या जुन्या म्हणजे पथ विभागातच पदोन्नती देण्यात आली आहे. श्रीधर येवलेकर (Shridhar Yevlekar PMC) यांना बांधकाम विभाग देण्यात आला आहे. ते याआधी मलनिःस्सारण, देखभाल व दुरुस्ती विभागात होते. दिनकर गोजारे (Dinkar Gojare PMC) यांना मलनिःस्सारण, देखभाल व दुरुस्ती विभाग देण्यात आला आहे. ते आधी पथ विभागात होते. अभिजित डोंबे (Abhijit Dombe PMC) यांना प्रकल्प कार्यालय 1 मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. डोंबे हे पथ विभागात होते. श्रीकांत वायदंडे (Shrikant Vaydande PMC) यांना पाणीपुरवठा विभाग देण्यात आला आहे. ते पूर्वी बांधकाम विभागात होते. राजेश बनकर (Rajesh Bankar PMC) यांना बांधकाम विभाग देण्यात आला आहे. ते पूर्वी पाणीपुरवठा विभागात होते.