PMC New Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात

Homeadministrative

PMC New Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात

Ganesh Kumar Mule Apr 22, 2025 9:18 PM

Pune Traffic | विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका
Maharashtra Budget | राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत अजित पवार विक्रमाच्या वाटेवर!
PMC Pune Recruitment Exam | पुणे महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!

PMC New Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात

नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

 

Pune Municipal Corporation New Website – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेनेदेखील बदलत्या काळानुसार आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश केला आहे. गतिमान आणि पारदर्शक कामकाजाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन पुणे महानगरपालिकेचे https://pmc.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आकर्षक आणि अद्ययावत स्वरूपामध्ये विकसित करण्यात आले आहे. ‘राज्य शासनाच्या १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा’ उपक्रमाच्या अंतर्गत या संकेतस्थळाची निर्मिती करून सर्व विभागांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळाचे Security ऑडिट CERT – IN नोंदणीकृत संस्थे मार्फत करण्यात आले असून, GIGW च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे विकसित करण्यात आले आहेत. नागरिकांना पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेले हे संकेतस्थळ ‘मोबाईल फ्रेंडली’ आहे. त्यामुळे नागरिक मोबाईलच्या माध्यमातून सुलभपणे हे संकेतस्थळ वापरू शकतात. या अद्ययावत संकेतस्थळामुळे पुणे महानगरपालिकेने डिजिटल प्रगतीचा एक नवा टप्पा गाठला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

नवे संकेतस्थळ विकसित करताना सध्याच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नव्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली आहे. यात युआय/युएक्स डिझाईन, सुधारित नेव्हिगेशन आणि कार्यक्षमता यासारख्या अनेक बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना माहिती सहज उपलब्ध होईल. नागरिक आणि व्यावसायिक यांच्यासाठी स्वतंत्र सेक्शन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधिताना या सुविधा सुलभपणे वापरता येतील. पुणे महानगरपालिकेच्या लोकाभिमुख कामकाजामधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

सदर संकेतस्थळाचे उदघाटन मा. पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मा. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (ज )  एम. जे. प्रदीप चंद्रन, मा. पुणे महानगरपालिका पथ विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता श्री नंदकिशोर जगताप,  पुणे महानगरपालिका उप आयुक्त  प्रतिभा पाटील, मा. पुणे महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख  राहुल जगताप व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हे संकेतस्थळ केवळ माहितीचे साधन नसून, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील एक दुवा आहे. या संकेतस्थळामुळे पुणे महानगरपालिका प्रशासन अधिक नागरिकाभिमुख बनण्यास मदत होईल. जास्तीत जास्त लोकांनी या नव्या आणि अद्ययावत संकेतस्थळाचा लाभ घ्यावा असे पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.