PMC MSU | पुणे महानगरपालिकेचे मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट कार्यान्वित! संसर्गजन्य आजारांच्या साथीचे वेळेत  होणार  निदान

Homeadministrative

PMC MSU | पुणे महानगरपालिकेचे मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट कार्यान्वित! संसर्गजन्य आजारांच्या साथीचे वेळेत  होणार  निदान

Ganesh Kumar Mule Sep 25, 2025 9:02 PM

Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | उत्पन्न मर्यादेबाबत पुणे महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय 
Sadhu Vaswani Flyover | Pune City Traffic Police | साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद! | वाहतूक पोलिसांकडून दिली ही पर्यायी व्यवस्था
Pune News | तूर्तास तरी पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका नाहीच!

PMC MSU | पुणे महानगरपालिकेचे मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट कार्यान्वित! संसर्गजन्य आजारांच्या साथीचे वेळेत  होणार  निदान

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे शहरात मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट (MSU) कार्यन्वित करण्यात आले असून त्याअंतर्गत कार्यरत मनुष्यबळाचे प्रशिक्षण पुणे महानगरपालिका व NCDC, दिल्ली यांच्या मार्फत २३ ते २५ सप्टेंबर  दरम्यान आयोजित करण्यात आले होते. २५ सप्टेंबर  रोजी महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांच्या अध्यक्षते खाली मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट (MSU) चे उद्दिष्ट व MSU अंतर्गत कामकाजाची माहिती इतर विभागांनाही होण्यासाठी तसेच पुढील कालावधीमध्ये काही साथरोग उद्भवल्यास साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरिता सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय असण्याच्या दृष्टीने विविध विभागांची (Stake Holder) समन्वय सभा आयोजित करण्यात आली.  अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.  (Pune Municipal Corporation – PMC)

या सभेस Airport Authority, भारतीय हवामान विभाग, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, रेल्वे विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन, NIV, WHO, राज्य किटकजन्य आजार नियंत्रण विभाग, राज्य पशु संवर्धन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यलय, राज्य सर्वेक्षण विभाग, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, पुणे इंडिअन अकॅडेमी ऑफ पेडीयाट्रिक्स, पुणे महानगर पालिकेकडील पाणी पुरवठा, मल निस्सारण, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, विद्युत, भवन रचना व आरोग्य विभागाकडील प्रतिनिधी उपस्थित असल्याचे MSU इन्चार्ज तथा सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिटमुळे पुणे महानगरातील संसर्गजन्य आजारांच्या साथीचे वेळेत निदान, प्रतिबंध आणि नियंत्रण यामध्ये मोठी मदत होणार आहे, असे मा. नवल किशोर राम आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी नमूद केले. MSU युनिटच्या स्थापनेमुळे विविध क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व अधिकारी यांना तांत्रिक प्रशिक्षण मिळणार असून, यामुळे पुण्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्तांनी पुढे सांगितले की, “MSU हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या युनिटच्या माध्यमातून वेळेवर माहिती संकलन, रोगांचे विश्लेषण व त्यावर आधारित त्वरित उपाययोजना राबविणे शक्य होईल. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी ही एक प्रभावी यंत्रणा ठरेल.” हे युनिट भारतातील सर्वोत्तम, सुसज्ज व अत्याधुनिक होण्या करिता भवन रचना विभागाने प्राधान्याने काम करण्याबाबत सूचना दिल्या.

मा. आयुक्तांनी सांगितले की पुणे शहराचा साथरोगाचा इतिहास पाहता येथे सतत विविध आजारांचा उद्रेक होत असतो उदाहरणार्थ 2009 मध्ये स्वाईन फ्लू 2020 मध्ये कोविड तसेच 2025 मध्ये जीबीएस अशा प्रकारचे प्रमुख उद्रेक तसेच पर्यावरण व हवामान बदल, दुषित अन्न व पाणी, तसेच पशु-पक्षी यांच्या माध्यमातून उद्भवणारे विविध आजार व उद्रेक यांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळा सक्षमीकरण, प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच जनजागृती याकरिता पुणे महानगरपालिकेचे मेट्रोपॉलिटन सर्विलांस युनिट हे मध्यवर्ती व महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी MSU कार्यान्वित करण्यामागील पार्श्वभूमी तसेच MSU पुणे सद्यस्थिती सांगताना विविध साथरोगांचे पुणे शहरातील प्रभागानुसार मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट मार्फत मॅपिंग व डेटा अॅनालिसिस करण्यात येणार असून त्यामुळे साथरोग उद्रेक टाळण्याकरिता MSU हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे अधोरेखित केले.

केंद्रीय स्तरावरील अधिकारी डॉ. शुभांगी कळसुंगे, सहसंचालक IDSP, NCDC यांनी भारतातील २० शहरांपैकी पुण्यातील मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट हे अत्यंत अल्प कालावधीत कार्यन्वित केल्या बद्दल अभिनंदन करत राष्ट्रीय पातळीवरील साथरोग प्रतिबंधक कामकाजाशी याची सांगड घालण्यात येईल, असे स्पष्ट केले.

डॉ. प्रदीप आवटे तांत्रिक सल्लागार वर्ल्ड बँक यांनी वन हेल्थ व संसर्गजन्य आजार यांचा परस्पर संबंध असल्याने आंतरविभागीय समन्वय अत्यंत महत्वाचा असल्याचे नमुद केले, पुण्यातील या प्रशिक्षण उपक्रमाचे अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय स्तरावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. नीना बोराडे आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी MSU च्या कामकाजा बाबत माहिती दिली. या युनिटमुळे शहरातील आरोग्य सेवांना वैज्ञानिक व तांत्रिक बळकटी मिळणार असल्याचे नमुद केले.

नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व यापुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: