PMC Law Committee | पुणे मनपातील 8 बालरोगतज्ज्ञ पदे पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव विधि समितीसमोर

Homeadministrative

PMC Law Committee | पुणे मनपातील 8 बालरोगतज्ज्ञ पदे पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव विधि समितीसमोर

Ganesh Kumar Mule Jul 22, 2026 9:04 PM

Pune PMC News | क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार | विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन
Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच
Video | PMC Water Tank  | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की! 

PMC Law Committee | पुणे मनपातील 8 बालरोगतज्ज्ञ पदे पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव विधि समितीसमोर

| 13 ते 21 वर्षे सेवा असलेल्या DCH पदवीधारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संधी : शासन-पिंपरीच्या धर्तीवर RR मध्ये बदलाची मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील बालरोगतज्ज्ञ वर्ग 1 ची 8 रिक्त पदे सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरावीत, असा प्रस्ताव आता विधि समितीसमोर ठेवण्यात आला आहे. यासाठी राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर पुणे मनपाच्या भरती नियमांमध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे. (PMC Health Department)

राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदिनी धेंडे आणि शितल सावंत यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

प्रस्तावात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेत सध्या 13 ते 21 वर्षांपासून सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांकडे डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ अर्थात DCH ही MCI मान्यताप्राप्त पदवी आहे. हे सर्व अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून बालरोग आणि नवजात शिशु विभागात अविरत सेवा देत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बालरोगतज्ज्ञाची एकूण 8 पदे रिक्त आहेत. 2018 च्या पुणे महानगरपालिका भरती नियम RR नुसार ही सर्व पदे सध्या सरळ सेवेतून म्हणजेच थेट भरतीद्वारे भरण्यात येत आहेत.

प्रस्तावात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे बालरोगतज्ज्ञाची पदे पदोन्नतीने भरली जातात. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेनेही आपल्या भरती नियमांमध्ये बदल करून ही 8 पदे पदोन्नतीने भरावीत.

पुणे महानगरपालिकेत इतर अनेक वैद्यकीय पदे पदोन्नतीने भरली जातात. त्याचप्रमाणे बालरोगतज्ज्ञाची पदेही पदोन्नतीने भरल्यास सेवा करणाऱ्या अधिकारी वर्गाला न्याय मिळेल, असा युक्तिवाद प्रस्तावात करण्यात आला आहे.

या प्रस्तावावर आता विधि समिती चर्चा करून निर्णय घेणार आहे. जर विधि समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि भरती नियमात बदल झाला, तर DCH पदवी असलेल्या आणि 13 ते 21 वर्षे सेवा असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0