PMC JE Recruitment Exam | ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच दिवशी मार्क आणि मेरीट क्रमांक समजू द्या | Contratctors असोसिएशन ची महापालिका प्रशासनाकडे मागणी 

Homeadministrative

PMC JE Recruitment Exam | ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच दिवशी मार्क आणि मेरीट क्रमांक समजू द्या | Contratctors असोसिएशन ची महापालिका प्रशासनाकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Nov 27, 2025 7:26 PM

PMC Standing Committee | पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता
Again four member wards | पुन्हा चार सदस्यीय प्रभाग | 2017 नुसार वाॅर्ड संख्या
Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

PMC JE Recruitment Exam | ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच दिवशी मार्क आणि मेरीट क्रमांक समजू द्या | Contratctors असोसिएशन ची महापालिका प्रशासनाकडे मागणी

 

Contractors Association Pune – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या प्रवेश परीक्षा पद्धती बाबत Contratctors असोसिएशन ने आक्षेप घेतले आहेत. ज्या दिवशी पेपर होईल, त्याच दिवशी लगेच संबंधित उमेदवाराला त्याचे मार्कस आणि त्याचा मेरिट क्रमांक समजले पाहिजे. अशी पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी. अशी मागणी संघटनेने केली आहे. (Pune PMC News)

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार  पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली असून  ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.  यापूर्वी झालेल्या प्रवेश परीक्षेनंतर परीक्षेचा निकाल लागणे आणि मेरीट जाहीर होणे या कामासाठी सुमारे दोन ते अडीच महिन्याचा कालावधी गेला. वास्तविक ऑनलाईन परीक्षा असताना पेपर सबमिट केल्या क्षणी संबंधित उमेदवारास त्याचे मार्क आणि त्याचा मेरिट क्रमांक समजणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या एम. एस. सी. आय. टी. व इतर सर्व ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेमध्ये हीच पद्धत अवलंबिली जात आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये दोन महिन्याचा कालावधी का लागतो? हे समजत नाही. यामुळे या प्रक्रियेबाबत संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे. संघटनेचे बहुतांश सभासद हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता असून त्यांच्या दृष्टीने ही परीक्षा खूप महत्वाची आहे. अनेक बेरोजगार सुशिक्षित अभियंता यांनी याबाबत आमच्या संघटनेकडे तक्रार केली आहे.

यामुळे संघटनेच्या वतीने अशी मागणी केली आहे  की, ज्या दिवशी पेपर होईल, त्याच दिवशी लगेच संबंधित उमेदवाराला त्याचे मार्कस आणि त्याचा मेरिट क्रमांक समजले पाहिजे. अशी पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा देखील संघटनेने दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: