PMC JE Recruitment 2025 Exam|  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुढे ढकलली  | नवीन तारीख अद्याप निश्चित नाही!

Homeadministrative

PMC JE Recruitment 2025 Exam|  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुढे ढकलली  | नवीन तारीख अद्याप निश्चित नाही!

Ganesh Kumar Mule Nov 27, 2025 6:49 PM

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी टाळली शिवसेना नेत्यांची भेट! | महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मात्र घेतली बैठक
NCP Vs Governor | Video | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यपालांना शिवरायांची पुस्तके भेट | राज्यपालांना काळे झेंडे ही दाखवले
Mahavikas Aghadi on EVM | महाविकास आघाडीचा आक्रमक | पवित्रा लोकशाहीच्या हत्येचा तीव्र निषेध

PMC JE Recruitment 2025 Exam|  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुढे ढकलली  | नवीन तारीख अद्याप निश्चित नाही!

 

PMC Junior Recruitment Bharti Exam – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याची तारीख अद्याप प्रशासना कडून निश्चित करण्यात आलेली नाही. तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील एकूण १८ शहरात ही परीक्षा होणार होती. पश्चिम महाराष्ट्र सहित मराठवाडा मधील विविध शहरांचा समावेश होता. मात्र अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रा बाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, असे मानले जात आहे. दरम्यान प्रशासना कडून सांगण्यात आले आहे कि, अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत. यासाठी आता १ डिसेंबर ला परीक्षा होणार होती.. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2025)

दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु केली होती. १६९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: