PMC HRMS Pay Roll and Pension Software | 1 तारखेलाच  वेतन देण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल!

HomeBreaking Newsपुणे

PMC HRMS Pay Roll and Pension Software | 1 तारखेलाच वेतन देण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल!

गणेश मुळे May 02, 2024 1:24 PM

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर! 
 Relief for retired employees of Pune Municipal Corporation!  |  104 pension cases cleared in January
PMC administration has announced regulations regarding Retired employees Notional increment 

PMC HRMS Pay Roll and Pension Software | 1 तारखेलाच  वेतन देण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल!

PMC Pay Roll and Pension Software – (The Karbhari News Service) –  महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना वेतन (Pay roll) आणि पेन्शन (Pension) हे ऑनलाईन प्रणाली द्वारे दिले जाते. मात्र ही सिस्टम फार जुनी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने आता नवीन सॉफ्टवेअर विकसित  केले आहे. त्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन साठी रखडत बसावे लागणार नाही. याला आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग (PMC Education Department) देखील आता यामध्ये जोडण्यात आला आहे. जानेवारी पासून याची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक कारणामुळे याची सुरुवात मे महिन्यापासून केली जाणार होती. मात्र मे महिना सुरु होऊन दोन दिवस झाले तरी प्रशासनाला वेतन करता आले नाही. 1 तारखेलाच वेतन देण्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. याबाबत मात्र प्रशासनाने आचारसंहितेची सबब पुढे केली आहे.  (PMC HRMS Pay Roll and Pension System)

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation)
 pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे. यामुळे आता वेतनासाठी जी 10 तारखेची वाट पाहावी लागते. ती पाहावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळेल. तसेच आज पेन्शनसाठी सेवानिवृत्त सेवकांना रखडावे लागते, ती अडचण देखील कमी होणार असून लवकरात लवकर पेन्शन हातात मिळण्यास मदत होणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. असे असले तरी प्रशासन 1 तारखेला वेतन करू शकले नाही. त्यामुळे हा दावा फोल ठरल्याचे मानले जात आहे.

– 10 तारखेनंतरच वेतन

याबाबत प्रशासनाला विचारले असता सांगण्यात आले कि सगळे बिल क्लार्क हे निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे बिले तयार होऊ शकली नाही. कर्मचारी उपलब्ध नसल्याने बिले देखील उशिरा होणार आहेत. त्यामुळे या महिन्यात 10 तारखेनंतरच वेतन होईल, असा खुलासा प्रशासना कडून करण्यात आला आहे.
—