PMC House Leader Ganesh Bidkar | पुणे महापालिका सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची निवड | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
PMC House Leader – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा गटनेते गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे (Mayor Manjusha Nagpure) यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. (Ganesh Bidkar BJP PMC Leader)
गणेश बिडकर हे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असून त्यांनी प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
महानगरपालिका कार्याचा अनुभव
२००२ ते २०२२ – सभासद, पुणे महानगरपालिका
प्रतिकूल मतदारसंघात भारतीय जनता पक्षासाठी भक्कम जनाधार निर्माण करत काँग्रेसच्या गटनेत्यास तसेच पुण्याच्या महापौरांना पराभूत करण्याचा पराक्रम. पूर्व भागात पक्षाची ताकद विस्तारण्यात महत्त्वपूर्ण योगदान.
२००९ ते २०१० – अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती
२०१० ते २०११ – अध्यक्ष, शहर सुधारणा समिती
२०११ ते २०१२ – अध्यक्ष, स्थायी समिती
२०१४ ते २०१७ – गटनेता, भारतीय जनता पार्टी
२०२० ते २०२२ – सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
निवडणूक व संघटनात्मक जबाबदाऱ्या :
२०२५ – पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख
२०२६ – पुणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी
२०२६ – पुणे महानगरपालिकेत गटनेता व सभागृह नेतेपदी निवड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक, पारदर्शक आणि जनहिताभिमुख कारभार करण्याचा माझा मानस आहे.
| गणेश बिडकर, सभागृह नेते

COMMENTS