Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
Mayor Manjusha Nagpure – The Karbhari News Service – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायमस्वरूपी (परमनंट) अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा प्रथमच बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांनाही बोनसचा लाभ मिळावा, यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. PMC Atal-bihari-vajpayee-medical-college)
महाविद्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने तयार करून आवश्यक मान्यतेसाठी सादर करावा, असे स्पष्ट निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या हक्काच्या लाभासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

COMMENTS