PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार |  अर्ज करण्यासाठी अजून मुदतवाढ

HomeBreaking Newsपुणे

PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार | अर्ज करण्यासाठी अजून मुदतवाढ

गणेश मुळे Feb 13, 2024 2:34 AM

PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया
Disqualified contractors in the tender process have to go to the PMC for the deposit amount!
PMC Pension Cases | पेन्शन आढावा बैठकीला सगळे खातेप्रमुख गैरहजर | महापालिका अतिरिक्त आयुक्त खाते प्रमुखावर करणार कारवाई

PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार |  अर्ज करण्यासाठी अजून मुदतवाढ

PMC Gunvant Kamgar Purskar | पुणे महापालिका कामगार कल्याण निधी (PMC Labour Welfare Fund) अंतर्गत महापालिकेतील वर्ग 1 ते 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना (PMC Employees and Officers) दरवर्षी गुणवंत कामगार पुरस्कार (Gunvant Kamgar Purskar) प्रदान केला जातो. यंदा दोन वर्षाचे म्हणजे 2020-21 आणि 2021-22 चे प्रत्येकी 20 असे 40 पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी कामगार कल्याण विभागाकडून (PMC Labour Welfare Department) अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर देखील मुदतवाढ देऊन पुरेसे अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे 29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी जारी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

दरवर्षी दिले जातात पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या 20 कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 चा प्रत्येकी 1 अधिकारी, वर्ग 3 मधील 5 कर्मचारी आणि वर्ग 4 मधील 13 कर्मचारी यांचा समावेश करण्यात येतो. (PMC Pune News)

| कशाच्या आधारे दिले जातात पुरस्कार?

गुणवंत कामगारपुरस्कार देताना विविध निकषांचा विचार केला जातो. यामध्ये खासकरून कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती देखील विचारात घेतली जाते. तसेच सेवाविषयक माहितीचा देखील विचार केला जातो. यामध्ये कर्मचाऱ्याने महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यात तसेच बचत करण्यात काय योगदान दिले, याबद्दलची माहिती विचारात घेतली जाते. कर्मचाऱ्यांची मागील 5 वर्षातील गोपनीय मूल्यमापन अहवालाची माहिती देखील घेतली जाते. तसेच कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमामधील सहभागाविषयी मते विचारात घेतली जातात. शैक्षणिक कार्याबद्दल कुठले पुरस्कार मिळाले आहेत का, याचा आढावा घेतला जातो. क्रीडा स्पर्धा मधील सहभाग आणि एखाद्या खेळामधील प्राविण्य देखील विचारात घेतले जाते. कर्मचाऱ्याने कुठले पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे का, वर्तमानपत्र किंवा मासिकात काही लेख लिहिले आहेत का, हा देखील विचार केला जातो. अशा सर्व गोष्टीचा आढावा घेऊन मार्क दिले जातात. (Pune Mahanagarpalika Purskar)

: मुलाखत कोण घेतात?

याशिवाय कर्मचाऱ्यांची मुलाखत देखील घेतली जाते. यासाठी 5 ते 6 लोकांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एक संचालक, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनातील एक अधिकारी, खाजगी कंपनीतील एक व्यक्ती आणि कामगारसंघटनेतील एक पदाधिकारी यांचा समावेश असतो. (PMC Pune Employees
The Karbhari: pmc Gunvant Kamgar Purskar

गुणवंत कामगार पुरस्कार अर्ज करण्यासाठी मुदतवाढ बाबतचे परिपत्रक