PMC Fire Department | इमारतींना आणि आस्थापनांना फायर यंत्रणा नसेल तर …! पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा नागरिकांना इशारा 

HomeBreaking Newsपुणे

PMC Fire Department | इमारतींना आणि आस्थापनांना फायर यंत्रणा नसेल तर …! पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा नागरिकांना इशारा 

गणेश मुळे Feb 15, 2024 3:48 PM

PMC Fire Brigade | अखेर अग्निशमन दलाकडून शिवणे येथे पाण्यात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका!
PMC Fire Department warns punekar… If buildings and establishments do not have a fire system…! 
Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

PMC Fire Department | इमारतींना आणि आस्थापनांना फायर यंत्रणा नसेल तर …! पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा नागरिकांना इशारा

PMC Fire Department | कोणत्याही इमारतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. तशी फायर यंत्रणा नसेल तर बसवून घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) वतीने करण्यात आले आहे. अन्यथा काही दुर्घटना झाली तर त्याला नागरिक जबाबदार असतील, असा इशारा मुख्य अग्निशमन  अधिकारी देवेंद्र पोटफोडे (Chief Fire officer of Pune Devendra Potfode) यांच्या वतीने देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६’ हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून अधिनियमातील कलम ३ ( १ ) प्रमाणे कोणत्याही इमारतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे तसेच कलम ३ ( ३ ) नुसार, लायसेन्स प्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची आहे. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना व आस्थापनांना जसे ( उदा. उंच निवासी इमारती, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक व्यापारी संकुले, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये इत्यादी ) कळविण्यात आले आहे कि, आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कलम ३ पोट कलम ( १ ) मध्ये विनिर्धिष्ट केल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये बसविलेल्या आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित व सुस्थितीत ठेवावी व याबाबतचे लायसेन्स प्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र ( फॉर्म – बी ) मुख्य अग्निशमन अधिकारी यांना वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, महात्मा फुले पेठ, न्यू टिंबर मार्केट, पुणे-४११०४२ या ठिकाणी सादर करावे. सदर ( फॉर्म – बी) वेळेत सादर न केल्यास व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची राहील याची नोंद घ्यावी.
या प्रकरणी विहित मुदतीत आग प्रतिबंधक उपाययोजना सुस्थितीत असले बाबतचा फॉर्म “बी” सादर न केल्यास ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६’ च्या कलम ८ (२), नियम ११ ( १) नुसार अग्निशमनाच्या दृष्टीने सुरक्षित नसणाऱ्या इमारतींचा सदर आस्थापनांचा पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा बंद करण्यासारखी कारवाई करण्याची शिफारस करणे क्रमप्राप्त राहील. लायसेन्स प्राप्त अभिकरणांची यादी maharashtrafireservice.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तसेच ज्या इमारतींमध्ये आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही त्यांनी तत्काळ लायसेन्स प्राप्त एजन्सीकडून बसवून घेऊन त्यानुसार प्रमाणपत्र विहित कालावधीत अग्निशमन दलाच्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे अथवा formbpmcfire@gmail.com या इमेलवर पाठवावे.
नागरिकांनी आपली जिवित व वित्तहानी रोखण्यासाठी इमारतींमधील उपलब्ध अग्निशमन यंत्रणा नेहमीच सुस्थितीत व कार्यान्वित राहील याची योग्य ती खबरदारी घेऊन कार्यवाही करावी. महानगरपालिका अग्निशमन दलाने हे आवाहन केले आहे.