PMC Environment Week |पुणे महापालिकेच्या पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन
PMC Environment Week – (The Karbhari News Service) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज “पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), अतिरिक्त आयुक्त पृथ्वाराज बी. पी. (Prithviraj B P IAS), पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. ईरच भरुचा, तसेच विविध महानगरपालिका विभागांचे विभाग प्रमुख यांचे हस्ते करण्यात आले. आजानवृक्ष आणि सुवर्ण पिंपळाच्या रोपांना जलार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे करण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका आणि पुणे शहरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत ५ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत हा सप्ताह इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे आणि शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात येत आहे.
याठिकाणी टॉक शो, प्रेझेंटेशन, डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग, प्रात्यक्षिके, प्रदर्शने, रोपे वाटप, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा तपशील पुणे महानगरपालिकेच्या सोशल मीडिया, वेबसाइट
www.pmc.gov.in आणि इंद्रधनुष्य केंद्राचा
www.indradhanushyapune.
उद्घाटन प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त म्हणाले, “नैसर्गिक साधन संपत्ती ही विपुल प्रमाणात नसल्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टीकचा वापर करत आहोत. परंतु त्याची विल्हेवाट ही योग्य रीतीने करणे आवश्यक आहे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर सर्वांनी जपून केला पाहिजे. पुणे महानगरपालिकेमार्फत हवा, पाणी, जमीन ईत्यादीचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणारे विविध उपाय राबविणे ही महापालिकेची जबाबदारीच आहे. पर्यावरण दिनानिमित्त एकत्र जमलेले सर्व संस्था आणि महापालिका मिळून सर्वांनी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे.”
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या प्रसंगी “हवामान
बदलामुळे आपण सर्वांना जाणविणारे बदल जसे की, अवकाळी पाऊस, पूर, वादळे, उष्णतेची लाट ईत्यादी सारखे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. त्यामुळे हवामान बदलास सामोरे जाणेसाठी पुणे महानगरपालिका आणि शहरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.” असे नमूद केले.
पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. ईरच भरुचा त्याचे भाषणात बोलताना म्हणाले “प्रत्येक
दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.”
वंदना चव्हाण यांनी पुण्याच्या जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुणे शहरातील नागरिक आणि प्रशासन यांचेमार्फत केल्या गेलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला.
पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, जसे की नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, क्लायमेट कलेक्टिव्ह पुणे एन्व्हायर्नमेंटल फाउंडेशन, पुणे
संवाद, स्वच्छ, जीवीतनदी, ग्रीन बर्ड इनिशिएटिव्ह, बी बास्केट, नेचर वॉक,
निसर्गसेवक, डू सेव्ह फाऊंडेशन, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेट एज्युकेशन, परिसर, बांबू इंडिया, सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट, लायन्स क्लब पुणे, इको फ्रेंड्स आणि देवराई, ग्रीन हिल्स ग्रुप महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, टेरे पॉलिसी सेंटर, एन्व्हायर्नमेंटलिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, बायोस्फीअर, रे डिझाईन स्टुडीओ इत्यादींनी पर्यावरण सप्ताहात सहभाग घेतला असून विविध उपक्रम राबविण्यासाठी योगदान देत आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उपस्थितांना रोपे वाटप करण्यात आली. तसेच वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान अल्पदरात छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे रोपे विक्री करण्यात येणार असल्याने नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.